शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
4
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
5
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
6
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
7
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
8
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
9
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
10
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
11
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
12
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
13
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
14
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
15
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
16
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
17
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
18
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
19
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
20
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ

माळीण दुर्घटनेला ११ वर्षे; नवीन माळीण स्थिरावले, पाणी प्रश्न कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 09:59 IST

या भीषण दुर्घटनेत ४४ कुटुंबांतील १५१ जण मृत्युमुखी पडले. आता या दुर्घटनेला ११ वर्षे पूर्ण होत असताना, नवीन माळीण गावाने नवे रूप घेतले आहे, पण काही आव्हाने अजूनही कायम आहेत.

घोडेगाव : ३० जुलै २०१४ रोजी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे माळीण गावावर डोंगराचा कडा कोसळला. प्रचंड आवाजासह चिखलाचा लोंढा गावावर धडकला आणि अवघ्या काही क्षणांत संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या भीषण दुर्घटनेत ४४ कुटुंबांतील १५१ जण मृत्युमुखी पडले. आता या दुर्घटनेला ११ वर्षे पूर्ण होत असताना, नवीन माळीण गावाने नवे रूप घेतले आहे, पण काही आव्हाने अजूनही कायम आहेत.

दुर्घटनेनंतर शासनाने मयतांच्या वारसांना भरघोस मदत केली, तसेच विविध सामाजिक संस्थांनीही हातभार लावला. अडीच वर्षांत कायमस्वरूपी पुनर्वसन पूर्ण झाले. नवीन माळीण गावात ६८ घरे बांधण्यात आली असून, सर्व मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. गावकरी आता स्थिरावले असून, शेतीसह इतर व्यवसायात गुंतले आहेत. काहींनी जनावरे पाळली, तर काहींनी गरजेनुसार शासनाने दिलेल्या घरांजवळ घरे वाढवली आहेत.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात डिंभे धरण, आहुपेचे उंच कडे, भीमाशंकरचे जंगल आणि पाटण खोरे यांसारखी निसर्गरम्य ठिकाणे आहेत. माळीण आता पर्यटनस्थळ म्हणूनही उदयास आले आहे. अनेक पर्यटक जुन्या माळीणच्या दुर्घटनास्थळाला आणि नवीन पुनर्वसित गावाला भेट देण्यासाठी येतात.

गावकरी टँकरवर अवलंबून

नवीन माळीणमध्ये सर्व सुखसोयी असल्या, तरी पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. उन्हाळ्यात गावकऱ्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागते. गावकरी विजय लेंभे म्हणाले, “पाणी योजना आणि बुब्रा नदीत बंधारा बांधूनही ठोस उपाय निघाला नाही. पाण्याचा प्रश्न सुटावा, ही आमची प्रमुख मागणी आहे.” 

नवीन गावात कमल लेंभे यांना घर मिळाले नाही. त्यांचे जुन्या माळीणमधील घर सामायिक होते आणि नवीन घराची नोंद ग्रामपंचायतीच्या दप्तरात झाली नव्हती. त्यांच्या दिराला घर मिळाले, पण कमल यांना शासनाने घरकुल मंजूर केले तरी जागेअभावी त्या अजूनही तात्पुरत्या पत्र्याच्या शेडमध्ये राहतात - कमल लेंभे ग्रामस्थ 

स्मृतीस्तंभावर अभिवादन

३० जुलै २०२५ रोजी जुन्या माळीण येथील स्मृतीस्तंभावर अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मान्यवर आणि ग्रामस्थ स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून मृतांना श्रद्धांजली वाहतील. गावकरी आपल्या जुन्या घरांच्या ठिकाणी नैवेद्यपूजा करणार आहेत. आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकाराने स्मृतीस्तंभावर शेड बांधण्यात आले आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या आठवणी

कमाजी पोटे यांनी त्या भयंकर प्रसंगाची आठवण सांगितली, “रात्रभर पाऊस पडत होता. पाणी जमिनीत खोलवर मुरले, जमिनीचा श्वास गुदमरला आणि डोंगर खचला. दगड, झाडे, चिखलाचा लोंढा गावावर आला. माझे घर डोळ्यासमोर गाडले गेले. त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.” अमोल अंकुश म्हणाले, “नवीन माळीण टुमदार वसले आहे. स्मृतीस्तंभावर शेड बांधले गेले, पण पाण्याचा प्रश्न सुटणे गरजेचे आहे.”

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड