शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पालिकेच्या उत्पन्नाला आर्थिक मंदीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 17:32 IST

पुणे महापालिकेला चालू आर्थिक वर्षांत तब्बल दोन हजार कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता...

ठळक मुद्देया आर्थिक वर्षासाठी ६ हजार ७६५ कोटींच्या अंदाजपत्रकाला मान्यता तूट भरुन काढण्याकरिता उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यावर भर देण्यात येणार  डिसेंबर अखेरीस महापालिकेला ३ हजार ३४२ कोटी ५१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले

पुणे : पुणेकरांना पायाभूत सुविधा उपलब्ध करू देण्यासाठी महापालिकेच्या वतीने हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत; परंतु आर्थिक मंदीमुळे ठप्प झालेली बांधकामे, मिळकतकर आणि पाणीपट्टीची वाढत चालेली थकबाकी व इतर अनेक कारणांमुळे पुणे महापालिकेला चालू आर्थिक वर्षांत तब्बल दोन हजार कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता आहे. ही तूट भरुन काढण्याकरिता उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. आयुक्त शेखर गायकवाड यांनी महापालिकेच्या सन २०१९-२० या आर्थिक वर्षांसाठीचे अंदाजपत्रक गुरुवारी स्थायी समितीच्या खास बैठकीत अध्यक्ष हेमंत रासने यांना सादर केले.  सन २०१९-२० च्या अंदाजपत्रकातील उत्पन्नाचा आढावा घेतला असता या आर्थिक वर्षासाठी ६ हजार ७६५ कोटींच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आलेली होती.  डिसेंबर अखेरीस महापालिकेला ३ हजार ३४२ कोटी ५१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. येत्या तीन महिन्यात उत्पन्नामध्ये आणखी एक हजार कोटी रुपयांची भर पडेल असा प्रशासनाचा अंदाज आहे. महापालिका या आर्थिक वर्षात साधारणपणे ४ हजार ५०० कोटी रुपयांचा टप्पा गाठेल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत असल्यांने गतवर्षीच्या अंदाजपत्रकात जवळपास दोन हजार कोटींची तूट येण्याची शक्यता आहे. ====जुन्या योजना पूर्ण करण्यावर भर आयुक्तांनी आपल्या अंदाजपत्रकामध्ये कोणतीही नवीन योजना प्रस्तावित केलेली नाही. महापालिकेकडून सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर महापालिका आयुक्तांच्या अंदाजपत्रकामध्ये भर देण्यात आला आहे. यामध्ये २४ तास पाणीपुरवठा योजना,  नदीसुधार योजना, मेट्रो, बीआरटी, उड्डाणपूल यासारखे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे गायकवाड यावेळी म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौरbusinessव्यवसाय