शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेचा अट्टाहास स्वच्छतेसाठी की केवळ पुरस्कार मिळविण्यासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 12:55 IST

शहरामध्ये जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य; उपनगरामध्ये परिस्थिती अधिक गंभीर

ठळक मुद्देसध्या शहरामध्ये केंद्र शासनाचे स्वच्छ सर्वेक्षण अभियान सन २०२०

पुणे : शहरामध्ये जागोजागी रस्त्यांच्या कडेला पडलेले कचऱ्याचे ढीग, फुटपाथवर अन्य पदार्थ व विविध गोष्टींचा कचरा, काही ठिकाणी लहान-मोठी मृत जनावरे,  ठिकठिकाणी महिनोन्महिने पडलेला राडारोडा, उद्यांनामध्ये पडलेला कचरा, भिकाऱ्यांनी फुटपाथवर थाटलेली घरे ही वस्तुस्थिती शहरामध्ये सर्वत्र असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीमध्ये निदर्शनास आले. सध्या शहरामध्ये केंद्र शासनाचे स्वच्छ सर्वेक्षण अभियान सन २०२० राबविण्यात येत आहे. याअतंर्गत महापालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने दिवसरात्र काम सुरू आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करणे, स्वच्छता अभियानामध्ये विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालयांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाच्या पातळीवर हे प्रयत्न सुरु असले तरी ग्राऊंड पातळीवर मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. याबाबत 'लोकमत' च्या वतीने शहरामध्ये विविध भागांत स्वच्छतेसंदर्भात पाहणी करण्यात आली. यामध्ये वरील वस्तुस्थिती समोर आली. 

सिंहगड रस्त्यावर वडगाव पूल, कॅनॉल रस्त्यासह अनेक ठिकाणी जागोजागी कचऱ्याचे ढीग पडलेले दिसतात. राजाराम पूल, माणिकबाग, संतोष हॉललगतच्या परिसरामध्ये रस्ता, फुटपाथवरच गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या कामांचा राडारोडा तसाचा पडून आहे. या भागात राजाराम पुलापासून थेट नांदेड सिटीमध्ये अनेक ठिकाणी फुटपाथवरच जागोजागी भिकाºयांनी संसार थाटले असून, फुटपाथ प्रचंड घाण केले आहेत.   संपूर्ण वडगाव शेरी भागातील नागरिक सध्या रस्त्यांवर पडलेल्या कचºयामुळे त्रस्त आहेत. महापालिकेला तक्रार करूनदेखील याबाबत सुधारणा होताना दिसत नाही. या परिसरामध्ये अनेक ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा पडला की या परिसरातून टू व्हिलर चालवणेदेखील कठीण होते. तर काही भागांत नियमितपणे मृत जनावरे आणून टाकली जात असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. सारसबागेत ठिकठिकाणी प्लॅस्टिक बाटल्या, भेळीचे कागद, प्लॅस्टिक पिशव्या अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. इथे असणाºया कचराकुंड्या भरून वाहत आहे. तर काही तशाच मोकळ्या पडलेल्या आहेत. स्वच्छतागृहाची अवस्था फार बिकट आहे. पादचारी रस्त्यावर नागरिक शेंगांचे टरफले, वेष्टणे, खाण्याच्या पदार्थांची पाकिटे टाकताना दिसतात. बसस्थानकांवर प्रवासी बेफिकीरपणे कचरा फेकून देतात. आजूबाजूच्या रस्त्यांवर कचऱ्याच्या पिशव्या फेकलेले आढळून येतात. बसस्थानकावरील स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय झाली आहे. स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्या, रिकामे प्लॅस्टिक ग्लास, प्लॅस्टिक बाटल्या सर्वत्र पडलेल्या आहेत. मित्रमंडळ चौकात देखील कचऱ्याची हीच स्थिती असून, या भागात रस्त्यांच्या कामात राडारोडादेखील ठिकठिकाणी पडलेला आहे. 
गुरुवार पेठेतील बलवार आळीत घंटागाडी येत नसल्याने, तर गंज पेठेतील मासे आळीत घंटागाडी येत असून, तेथील व्यावसायिकाचा कचरा घंटागाडी घेत नसल्याने तिथे कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. यामुळे अत्यंत दुर्गंधीयुक्त कचरा येथील व्यावसायिक रस्त्याच्या कडेला असलेल्या कचरापेटीत टाकतात. ही कचरापेटी दररोज ओसंडून वाहत असल्याने गंभीर परिस्थिती आहे. ......................या विभागात एकच कचरापेटी आहे .व्यावसायिकांच्या चिकन, माश्यांचा कचरा टाकायला दुसरा पर्याय नाही. ही कचरापेटी नसेल तर रस्ताभर कचरा होईल. घंटागाडीवाले फक्त घरगुती कचरा घेऊन जात असल्यामुळे आम्हाला याच कचरापेटीत कचरा टाकावा लागतो. व्यावसायिक लोकांना कचरा टाकण्यासाठी दुसरा पर्याय निर्माण करून द्यावा.- गणेश परदेशी, गंज पेठ, मासे आळी...................काही विभागात सकाळी-संध्याकाळी घंटागाडी येते. तर बळवार, धनगर आळीत एकही वेळेस घंटागाडी येत नाही. कचरा ओला सुका वर्गीकरण अजिबात करत नाहीत. आमचं दुकान समोरच असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे  लागते. परिसरात दुर्गंधी पसरलेली असते आणि चार नगरसेवक असूनही या प्रश्नांकडे कोणीच गांभीर्याने लक्ष देत नाहीत.- अमोल उणेचा, गुरुवार पेठ, बलवार आळी..........आमच्या भागामध्ये कचरा घेऊन जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. यामुळे नागरिक ऑफिस व कामाला जाताना कचरा रस्त्यांच्या कडेला टाकून देतात. दररोज कचरा तसाच पडून राहत असून, दिवसेंदिवस कचरा वाढत आहे. पण त्या भागातील लोक तक्रार करत नाहीत. आम्हाला त्याच भागातून ये-जा करावी लागते; पण ते लोक तक्रार करत नाही. त्यामुळे आम्ही काही बोलत नाही. - सीमा नऱ्हे , माळवाडी ........

टॅग्स :PuneपुणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका