शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

पुणे महापालिका कर्मचाऱ्यांनो; एनआरसी-सीएएचा सर्व्हे करताय... परत जा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 10:11 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणाला आक्षेप

ठळक मुद्देमहापालिकेची घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याकरिता १३० पेक्षा अधिक पथके तयार शहरात आवश्यक ठिकाणी सोडियम हायपो क्लोराईडची फवारणी

लक्ष्मण मोरे - पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता महापालिका विविध उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक उपाय करीत असतानाच काही विशिष्ट नागरिकांकडून असहकार पुकारला जात आहे. महापालिकेने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याकरिता १३० पेक्षा अधिक पथके तयार केली आहेत. सर्वेक्षणाकरिता जात असलेल्या या पथकांना शहराच्या काही भागांमधून नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. तुम्ही एनआरसी-सीएए साठीच सर्वेक्षण करीत असल्याचा आरोप करीत या कर्मचाऱ्यांना परत पाठविण्यात आले.

शहरातल्या विशिष्ट मोहल्ल्यांमध्ये घडलेल्या या प्रकारांमुळे कोरोना विरुद्धच्या लढ्याला खीळ बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कोरोनाचा राज्यातील पहिला रुग्ण पुण्यामध्ये आढळून आला. त्यानंतर गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या ४० वर जाऊन पोहोचली आहे. तर, शेकडो संशयितांचे वैद्यकीय नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. शहरात आवश्यक ठिकाणी सोडियम हायपो क्लोराईडची फवारणी केली जात आहे. जवळपास पाच लाख पत्रकांद्वारे जनजागृती करण्यात आली असून पोस्टर्स, सोशल मीडिया आणि होर्डींगद्वारे जनजागृती सुरु करण्यात आली आहे. पालिकेने विदेशात प्रवास करुन आलेल्या आणि काही लक्षणे दिसत असलेल्या जवळपास अडीच हजार नागरिकांना होम क्वारंटाईनकरुन ठेवले आहे. त्यांच्यावर निगराणी ठेवण्यात येत आहे.खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करायला सुरुवात केली आहे.नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना कुटुंबातील कोणाला सर्दी, खोकला,ताप आहे का याची माहिती घेतली जात आहे.या पथकांतील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय साधने, मास्क, हातमोजे,सॅनिटायझर आदी सुरक्षा साधनेही पुरविण्यात आली आहेत. हे नागरिकदररोज शहरातील नागरिकांच्या घरीजाऊन हे सर्वेक्षण करीत आहेत.लक्षणे असलेल्यांची माहिती आरोग्य विभागाला दिली जात असून आवश्यकता भासल्यास उपचार अथवा क्वारंटाईन करण्याचा सल्ला दिला जात आहे...............अनेक सोसायट्यांमध्ये प्रवेश नाकारलाशहरातील मध्यवर्ती पेठा, उपनगरांसह सर्व परिसरात सर्वेक्षणाचे हे काम सुरु आहे. परंतु, काही ठराविक मोहल्ल्यांमध्ये आणि लोकवस्तीमध्ये या पथकांना प्रवेश नाकारला गेला. या सर्वेक्षणाच्या आडून एनआरसी आणि सीएएचे सर्वेक्षण केले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. 

सर्वेक्षण करणाऱ्या महिलांचे मोबाईलमधून चित्रीकरणही करण्यात आले. परंतु, आजाराची लक्षणे देताना नाव देणे बंधनकारक का करता, असा प्रश्न करुन सर्वेक्षण करणाऱ्या महिलांना पिटाळून लावण्यात आले. एनआरसी आणि सीएएच्या सर्वेक्षणाची शंका मनात धरुन पुकारला जाणारा असहकार समाजाच्या असल्याने त्याबद्दल जनजागृती करण्याची आवश्यकता यामुळे निर्माण झाली आहे.  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस