शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या उत्पन्नाला आर्थिक मंदीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 18:15 IST

प्रस्ताव घटले : बांधकाम विभागाचे उत्पन्न ४० टक्क्यांनी झाले कमी

ठळक मुद्देएकूण ८९९ कोटी ६७ लाख रुपयांच्या उद्दिष्टांपैकी ५४५ कोटी ६९ लाख रुपयांचे उत्पन्नबांधकाम विभागाच्या उत्पन्नामध्ये उद्दिष्टापेक्षा जवळपास ४० टक्क्यांनी घटतीन-चार वर्षांपूर्वी शहरात बांधकाम व्यवसायात आलेली मोठी तेजी आता ओसरली.

लक्ष्मण मोरे - 

पुणे : महापालिकेच्या सात हजार कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकामध्ये जवळपास दोन हजार कोटींची तूट येण्याची लक्षणे दिसत असून, उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या कर संकलन आणि कर आकारणी विभागासह बांधकाम विभागालाही उद्दिष्ट गाठणे अशक्यच दिसत आहे. बांधकाम विभागाच्या उत्पन्नामध्ये उद्दिष्टापेक्षा जवळपास ४० टक्क्यांनी घट झाली आहे. एकूण ८९९ कोटी ६७ लाख रुपयांच्या उद्दिष्टांपैकी ५४५ कोटी ६९ लाख रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळाले आहे. उत्पन्नाचा आलेख मागील चार वर्षांपासून खाली खाली जात असल्याने पालिकेला उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधावे लागणार आहेत.गेल्या काही वर्षांपासून असलेल्या आर्थिक मंदीमुळे पालिकेकडे येणारे बांधकाम प्रस्ताव कमी झालेच आहेत. त्यातच ‘रेरा’ कायद्याचा फटका बसल्याने बांधकाम प्रस्तावांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या बांधकाम विभागाला ठरवून देण्यात आलेले आर्थिक लक्ष्यही साध्य करता येत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे अधिकृत बांधकामांच्या प्रस्तावांचे प्रमाण घटत चालले आहे. आयटी कंपन्यांच्या आगमनानंतर पुण्याच्या कक्षा झपाट्याने विस्तारल्या. सिंहगड रस्ता, धायरी, कात्रज, कोंढवा-हडपसर, फुरसुंगी, विमाननगर, खराडी, कल्याणीनगर, हिंजवडी आदी परिसरात बांधकामांची लाट आल्याने जमिनीचे आणि पर्यायाने सदनिकांचे भावही गगनाला भिडले. अलिकडच्या काळात मगरपट्टा, अ‍ॅमेनोरा आणि नांदेड सिटीसारख्या टाऊनशीप उभ्या राहिल्या.विशेषत: हवेली तालुक्यात बांधकामाचा वेग प्रचंड होता. सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी शहरात बांधकाम व्यवसायात आलेली मोठी तेजी आता ओसरु लागल्याचे चित्र दिसत आहे. सुरुवातीला प्रतिसाद मिळालेला हा व्यवसाय मात्र गेल्या काही वर्षांत आर्थिक मंदीमुळे कमी होत गेला. घरांच्या मागणीअभावी या व्यवसायातील गुंतवणूकीवर परिणाम झाला आहे. महापालिकेच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर सदनिका रिकाम्या पडलेल्या असतानाही घरांच्या किमती मात्र अद्यापही कमी होत नसल्याचे चित्र आहे..........  आर्थिक मंदी, रेराचा व्यावसायाला फटका४आर्थिक मंदी, रेरा कायदा आणि जीएसटीमुळे व्यवसायाला फटका बसत आहे. अनेक व्यावसायिक अडचणीत असून, त्यांना कर्जाचे व्याज भरावे लागत आहे. या व्यावसायावर अवलंबून असलेल्या सिमेंट विक्रेते, हार्डवेअर, वीज, वाळू, डस्ट व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसू लागला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांसह पीएमआरडीएच्या हद्दीमध्ये बांधकामांना याच यंत्रणांची परवानगी आवश्यक आहे. ४परंतु, उपनगरांसह शहराच्या सीमाभागात ग्रामपंचायत सँक्शनच्या नावाखाली सर्रासपणे बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. अनेक ठिकाणी टेकड्यांची लचकेतोड सुरू आहे. परंतु, या बांधकामांमधील सदनिका अत्यंत कमी किमतीत मिळत असल्याने त्या खरेदी करण्याचे प्रमाणही मोठे आहे. ..........पालिकेकडील दाखल प्रस्ताव वर्ष        नवीन प्रस्ताव२०११-१२        १,७१८२०१२-१३        १३९४२०१३-१४        १२२८२०१४-१५        ११२६२०१५-१६        १२०३२०१६-१७        ७६०२०१७-१८        ८५२२०१८-१९        ८८७२०१९-२०    ..........४महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे दरवर्षी नवीन आणि पुनर्विलोकनासाठीचे प्रस्ताव दाखल होत असतात. ४या प्रस्तावांची पडताळणी करून तपासणी करून परवानग्या देण्याचे काम बांधकाम विभागाकडून केले जाते. ४बांधकाम विभागाकडून इमारत नकाशा मंजुरी, लेआउट मंजुरी, विस्तार, भोगवटा प्रमाणपत्र, जोते तपासणी प्रमाणपत्र, पुन्हा मुदत वाढविणे, अनधिकृत बांधकामांवर कारवाई, हस्तांतरण विकास हक्क (टीडीआर), फास्ट ट्रॅक प्रणालीमार्फत बांधकाम परवानगी देणे आदी प्रकारची कामे चालतात........पालिकेचे घटलेले उत्पन्नवर्ष                  अपेक्षित उत्पन्न              प्रत्यक्ष उत्पन्न                           (कोटीत)    

२०१५-१६              ७५१                                ७४४२०१६-१७            १०४५                               ५३२२०१७-१८             ११६५                            ५८०२०१८-१९            ८१५                              ६५४२०१९-२०          ८९९.६७                          ५४५.६९    ........ 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका