शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election Results 2026 : महापालिका निवडणुकीतील यशाच्या जोरावर जिल्ह्यात भाजपकडून स्वबळाची चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 19:51 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड मजबूत आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये किंबहुना बारामतीमध्येही भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत

पुणे: नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. या यशाच्या बळावरच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक स्वबळावर लढवण्याचाबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे विचारमंथन सुरू झाले आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये भाजपची कमी-जास्तप्रमाणात ताकद आहे. पण त्याला अजून थोडे बळ दिले तर जिल्हा परिषदेमध्ये कमळ फुलण्यापासून कोणी रोखणार नसल्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. दरम्यान, शिंदे गटाला बरोबर घ्यायचे की नाही यावर सध्या प्रकर्षणाने चर्चा सुरू आहे. इतकंच नाही तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र आल्याने नाराज झालेल्यांना आपल्या गोटात दाखल करण्यासाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड मजबूत आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये किंबहुना बारामतीमध्येही भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत. परंतु, आतापर्यंत अपेक्षित असे बन दिले न गेल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कमळ फुलले गेले नाही. शिंदेसेनेला बरोबर घेऊन आगामी निवडणुकीत उतरण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, त्यातच महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला घवघवी यश मिळाले. त्यामुळे झेडपी पंचायत समितीची निवडणुकही स्वबळावरच लढवण्याचा एल्गार काही पदाधिकाऱ्यांनी केला. दोन दिवसांपूर्वी भाजपची एक महत्वपूर्ण बैठक पार पाडली. या बैठकीला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आगामी निवडणुकीची रणनिती संदर्भात तोव उमेदवार निवडीवरही चर्चा करण्यात आली. यावेळी स्वबळावरच निवडणुक लढवण्याचा विचार उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मांडल्याचे समजते.

स्वबळावर लढायचे ठरवले तर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची भीतिही व्यक्त होत असल्याने भाजपची तळ्यात मळ्यात अशी स्थिती आहे. महत्वाचे म्हणजे बारामतीमध्ये कमळ कसे फुलवता येईल यावर भाजपने सध्या विशेष लक्ष केंद्रीत केले असल्याचे समजते.

तीन माजी आमदारांना भाजपमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न

दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्याचे संकेत मिळू लागल्याने तसेच भाजपमधील काही मंडळींना थेट पक्षप्रवेश देण्यात येत असल्याच्या कारणावरून दोन्ही गटातील अनेक नेत्यांसह पदाधिकारी नाराज आहेत. विशेष करून खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील हे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांची अजित पवार गटाशी वाढलेल्या सलगीमुळे नाराज आहेत. तसे त्यांनी बोलूनही दाखवले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार अशोक पवार, जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांचीही एकत्रिकरणामुळे धाकधूक वाढली आहे. कारण पडतीच्या काळात पक्षाला ज्यांनी तारले त्यांना विश्वासात न घेताच एकत्रिकरणावर चर्चा होऊ लागल्या आहेत. यामुळे भाजपने यासर्व नाराज मंडळींना हेरून त्यांना पक्षात येण्याची रणनिती आखली असल्याचे समजते. दरम्यान, तिकडे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेतच पण त्यांना मुहूर्त काही सापडत नाही. त्यामुळे त्यांच्याबरोबरच नाराज मंडळींना देखील भाजपमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे भाजपमधीलच एका पदाधिकाऱ्याने सांगितले.प्रदीप गारटकर भाजपमध्ये दाखल

नगरपालिका निवडणुकीदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची साथ सोडलेले तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी शनिवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. गारटकर यांची पार्श्वभूमी पाहिली तर पुर्वीपासून ते संघाच्या जवळचे मानले जातात. यामुळे इंदापूरसह बारामतीमधील भाजप कार्यकर्त्यांना लढण्यास नव्याने बळ मिळणार आहे. इतकच नाही तर त्यांच्या येण्याने भाजपमध्ये असलेल्यांना काही फरक पडत नसल्याचे दिसत असले तरी तालुक्यातील स्थान डळमळीत होण्याच्या भीतिने अनेकांची धाकधूक वाढली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Considers Solo Run in District Elections After PMC Victory.

Web Summary : Riding high on PMC success, BJP contemplates contesting district and panchayat elections independently. Discussions involve potentially including the Shinde faction and attracting disgruntled members from rival parties, especially focusing on Baramati and welcoming Pradeep Garatkar to strengthen their base.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६