पुणे : पुणे महापालिकेचे आरक्षण महिला खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. महापौरपदाची निवडणूक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. पुणे महापालिकेचे ५८ वे महापौर कोण होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची एकहात्ती सत्ता आली आहे. त्यानंतर महापौरपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात महापौरपद महिला खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. आता महापौरपदाची निवड करण्यासाठी प्रक्रिया सुरू होणार आहे. विभागीय आयुक्त या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती करणार आहे. त्यानंतर सर्वसाधारण सभा सात दिवसांत घेण्याची नोटीस काढली जाते. महापौरपदाची निवडणूक होणार त्या दिवशी सभा सुरू झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांची मुदत दिली जाते. त्यानंतर महापौरपदासाठी मतदान घेतले जाते.
संबंधित पीठासीन अधिकारी महापौरपदी निवडून आलेल्या व्यक्तीची घोषणा करतात. महापौरपदाची निवडणूक प्रक्रिया करण्यासाठी पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती केली जाते. त्यानंतर सात दिवसांची मुदत देऊन सभा बोलवावी लागते. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे.
Web Summary : Pune's mayoral election, reserved for women, is likely in early February. BJP's dominance sets the stage. The divisional commissioner will appoint an officer to oversee the process, including candidate nominations and voting. The announcement of the new mayor will follow promptly.
Web Summary : पुणे का महापौर चुनाव, महिलाओं के लिए आरक्षित, फरवरी के पहले सप्ताह में होने की संभावना है। भाजपा का प्रभुत्व मंच तैयार करता है। संभागीय आयुक्त उम्मीदवार नामांकन और मतदान सहित प्रक्रिया की देखरेख के लिए एक अधिकारी नियुक्त करेंगे। नए महापौर की घोषणा जल्द ही की जाएगी।