शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election Results 2026 : पालिकेच्या सभागृहात १०२ नवे चेहरे; नव्यांमध्ये ६० महिला अन् ४२ पुरुषांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 12:57 IST

- नवीन चेहऱ्यांत महिलांची संख्या ६०, तर पुरुष ४२ ; सभागृहात एकूण ८८ महिला, तर ७७ पुरुष

हिरा सरवदे

पुणे : महापालिकेच्या नव्या सभागृहात विविध पक्षांचे तब्बल १०२ नवीन आणि ६३ जुने चेहरे पाहायला मिळणार आहेत. या नवीन चेहऱ्यांमध्ये ६० महिला नगरसेविका आणि ४२ पुरुष नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे ज्यांनी याआधी नगरसेवक म्हणून काम केलेले आहे अशा अनुभवी नगरसेवकांना पहिल्यांदाच निवडून आलेल्या नव्या दमाच्या सहकाऱ्यांशी समन्वय साधून त्यांना सोबत घेत महापालिकेचा कारभार हाकावा लागणार आहे.महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक २०१७ मध्ये झाल्यानंतर गेली आठ वर्षे निवडणूकच झाली नाही. त्या निवडणुकीत भाजप ९७, राष्ट्रवादी कॉंग्रेस ४२, शिवसेना १०, कॉंग्रेस ९ आणि अपक्ष असे पक्षीय बलाबल होते. महापालिका सभागृहाची मुदत मार्च २०२२ मध्ये संपल्यापासून महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती होता. न्यायालयाच्या आदेशानुसार चार वर्षांपासून रखडलेली महापालिकेची निवडणूक अखेर झाली आहे.या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने ९९ पैकी ५३ माजी नगरसेवकांचा पत्ता कट करून ४६ जुने व नवीन असे १६५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या संयुक्त पॅनलसह शिंदेसेना आणि काँग्रेस, उद्धवसेना व मनसे या पक्षांचे आव्हान होते. महापालिकेची निवडणूक चार पॅनल आणि अपक्षांमध्ये झाल्याने विरोधी मतांचे विभाजन होऊन सत्ताधारी भाजपचे मागील निवडणुकीपेक्षा अधिक म्हणजे ११९ नगरसेवक निवडून आले, तर दोन्ही राष्ट्रवादीचे ३०, काँग्रेस १५ आणि उद्धवसेनेचा केवळ १ नगरसेवक निवडून आला. शिंदेसेनेला आणि मनसेला भोपळाही फोडता आला नाही. निवडून आलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये तब्बल १०२ नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत. तर ६३ नगरसेवक यापूर्वी निवडून आलेले सदस्य आहेत. नवीन सदस्यांमध्ये ६० महिला आणि ४२ पुरुष नगरसेवकांचा समावेश आहे, तसेच यापूर्वी नगरसेवक म्हणून काम केलेले अनुभवी नगरसेवक ५३ असून, यामध्ये २८ महिला आणि ३५ पुरुषांचा समावेश आहे. त्यामुळे अनुभवी नगरसेवकांना नवख्यांना सोबत घेऊन महापालिकेच्या कारभाराचा गाडा हाकावा लागणार आहे.--------

सभागृहात पुरुषांपेक्षा महिला नगरसेवकांची संख्या जास्त -महापालिकेच्या सभागृहातील सदस्यांची संख्या १६५ आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के महिलांना आरक्षण देणे बंधनकारक असल्याने ८३ महिलांना प्रतिनिधीत्व मिळते. मात्र, भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादींनी पुरुषांपेक्षा जास्त महिलांना संधी उमेदवारी दिल्याने निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये महिला नगरसेविकांचा टक्का जास्त आहे. निवडून आलेल्या सदस्यांमध्ये ८८ महिला, तर ७७ पुरुष नगरसेवकांचा समावेश आहे.

--------निवडून आलेले नवीन चेहरे व पक्ष

- भाजप - ४८ महिला - २७ पुरुष- राष्ट्रवादी - ०६ महिला - ११ पुरुष- काँग्रेस - ०६ महिला - ०३ पुरुष* उद्धवसेना - ०० महिला - ०१ पुरुष

एकूण - ६० - ४२ पुरुष

----------निवडून आलेले जुने चेहरे व पक्ष -

- भाजप - १९ महिला - २२ पुरुष- राष्ट्रवादी - ०८ महिला - ०६ पुरुष- काँग्रेस - ०१ महिला - ०५ पुरुष- एकूण - २८ महिला - ३५ पुरुष

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Municipal Election 2026: 102 New Faces, Women Dominate

Web Summary : Pune's new municipal council sees 102 fresh faces, dominated by 60 women. BJP leads with 119 seats, followed by NCP and Congress. Experienced members must guide newcomers in governance. Women outnumber men in the 165-member house.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६Puneपुणे