शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिका निवडणूक : अजमावण्या आपली ताकद, सगळेच जाहले सज्ज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 15:05 IST

सगळेच राजकीय पक्ष महापालिकेत सत्ता कशी मिळेल याच्या तयारीला लागले आहेत...

- राजू इनामदार

पुणे : लांबणीवर पडणार अशी खात्री वाटत असलेली महापालिका निवडणूक सर्वोच्च न्यायालयामुळे तोंडावर आली. त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष महापालिकेत सत्ता कशी मिळेल याच्या तयारीला लागले आहेत. बैठका, मेळावे, चर्चा, मतदारसंपर्क अभियान असे पक्षांचे तर प्रभाग निश्चिती, तिथे वेगवेगळे लोकोपयोगी पण स्वत:ला उपयोगी पडतील असे उपक्रम राबविण्यात संभाव्य उमेदवार दंग आहेत.

भारतीय जनता पक्षाला कधी नव्हे ती सलग ५ वर्षे मिळालेली एकहाती सत्ता कशी घालवता येईल याचा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसशिवसेना विचार करते आहे, तर या सर्व प्रस्थापितांना बाजूला सारून आपले स्वतंत्र असे काही करता यावे म्हणून दिल्लीनंतर पंजाबमध्ये झेंडा रोवलेली आम आदमी पार्टी व २९ नगरसेवकांवरून एकदम २ वर आलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही प्रयत्न करीत आहे.

महाविकास आघाडीचा निर्णय होईल तेव्हा होईल, आपण तयारीला तर लागू, असा विचार करून राज्यातील सत्तेत सहभागी असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस स्वतंत्रपणे मोर्चेबांधणी करीत आहेत. तर भाजपला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) बरोबर असल्याने व हिंदुत्वाचा मुद्दा जोर धरत असल्याने त्यात विरोधकांनी केलेले सर्व आरोप विरघळून जातील याची खात्री वाटत आहे.

अशी आहे राजकीय पक्षांची सद्यस्थिती

भारतीय जनता पार्टी

जमेची बाजू

महापालिकेची मागील ५ वर्षांची सत्ता. ९८ नगरसेवक निवडून आलेले. आरपीआय बरोबर. शहरातील ८ विधानसभा मतदार संघात आमदार. खासदारकीचा महापालिकेत येत असलेला पुणे शहर लोकसभा मतदारसंघ ताब्यात, कार्यकर्त्यांचा मोठा संच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद. केंद्रात असलेली सत्ता. हिंदुत्त्वाचा गजर.

उणे बाजू

नेत्यांमध्ये मोठी गटबाजी, सत्तेच्या ५ वर्षात पुरे करता न आलेले मोठे प्रकल्प, निविदांच्या स्तरावर झालेला भ्रष्टाचार, त्यावर विरोधकांकडून सातत्याने उडवला जाणारा धुरळा, वाढत असलेले संशयाचे जाळे. पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा अवाजवी आत्मविश्वास. नगरसेवकांचे बदलले राहणीमान, त्यांच्यावर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप.

राष्ट्रवादी काँग्रेस

जमेची बाजू

सलग दोन वेळच्या महापालिकेतील सत्तेला मागील पंचवार्षिकमध्ये भाजपाने खो दिल्याचा राग. भाजपाच्या वावटळीतसुद्धा मागील वेळी निवडून आलेले ३९ नगरसेवक. पोटनिवडणुकीतही एक मिळालेला विजय, अनुभवी नगरसेवकांची संख्या, उपमुख्यमंत्री अजित पवार देत असलेली ताकद, उपनगरांमधील वर्चस्व.

उणे बाजू

शहराच्या मध्य भागात ताकदीचा अभाव, पक्षावर उमटलेला विशिष्ट वर्गाचा ठसा, दिग्गज नगरसेवकांचे प्रभागापुरते पाहण्याचे धोरण, संघटनेला शक्ती देण्याकडे नेत्यांचे दुर्लक्ष, महापालिका सभागृहातील सत्ताधाऱ्यांबरोबर केलेल्या तडजोडींवर पडलेला प्रकाश, संशयाने पाहणारे मित्र पक्ष.

शिवसेना

जमेची बाजू

विसर्जित सभागृहात १० नगरसेवक, राज्यातील सत्ता, ठाकरे परिवाराची क्रेझ, युवकांचा पक्षाकडे असलेला ओढा, पक्षाच्या प्रतिमेशी एकरूप झालेले कार्यकर्ते.

उणे बाजू

संघटना बांधणीकडे दुर्लक्ष, नगरसेवकांना रचनात्मक काम करण्यात आलेले अपयश, लोकोपयोगी उपक्रम या पक्षाच्या वैशिष्ट्यांचे विस्मरण. मित्र पक्षांची कमतरता, महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्षांबरोबर राजकीय फरफट.

मनसे

जमेची बाजू

पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचा करिष्मा, हिंदुत्त्वाची नवी भूमिका, ठाकरे यांनी पुणे शहराला दिलेले महत्व, तरूणांचा पक्षाकडे असलेला कल, सातत्याने आंदोलने, स्थानिक प्रश्नांवर कायम आक्रमक.

उणे बाजू

प्रभावी नेत्यांचा अभाव, एकखांबी तंबू, २९ नगरसेवकांवरून फक्त २ नगरसेवक, कुठेही सत्ता नाही. संपूर्ण शहरव्यापी संघटन नाही.

काँग्रेस

जमेची बाजू

राष्ट्रीय पक्ष, अनेक वर्षांची सत्ताधारी. तळापर्यंतचा मतदार. सध्या ११ नगरसेवक. पक्षाच्या इतिहासातील कामगिरीमूळे मतदारांमध्ये सहानुभूती. चिन्ह सर्वांपर्यंत पोचलेले.

ऊणे बाजू

संघटना क्षीण. सगळे नेते आणि पदाधिकारीच. कार्यकर्त्यांची संख्या घटलेली. सर्व आघाड्या अकार्यक्षम. तेचतेच चेहरे. नव्यांना संधी नाही.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकMuncipal Corporationनगर पालिकाShiv SenaशिवसेनाMNSमनसेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस