शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुणे महापालिकेची 'ब्रेक द चेन' अंतर्गत 'रमजान' महिन्यासाठी नियमावली ; जाणून घ्या सविस्तर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 17:56 IST

पुणे शहरातील कोरोना वाढता कोरोना प्रादुर्भावामुळे रमजान उत्सवासाठी जाहीर करण्यात आलेल्या आदेशाचे पालन बंधनकारक.....!

पुणे: कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून शहरात कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरु आहे. याच दरम्यान, मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना १४ एप्रिलपासून सुरू झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. तसेच १४ एप्रिलपासून सुरू झालेला रमजान महिना संपेपर्यंत या नियमांचे पालन बंधनकारक राहणार आहे. 

रमजानसाठी असलेली नियमावली पुढीलप्रमाणे: * कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तार साठी मस्जिद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावे. नमाज पठणाकरिता मशिदीत किंवा मोकळ्या जागेत येऊ नये. * सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सोशल डिस्टनसिंग व  स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून पवित्र रमजान महिना साजरा करावा. * रमजान काळात मुस्लिम बांधव 30दिवस पहाटे पासून उपवास ठेवतात व संध्याकाळी मगरीब नमाज पूर्वी तो सोडतात.या सेहरी व इफ्तारच्या वेळी अनेक फळ, अन्न पदार्थ या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी संबंधित प्रभागाचे सहाय्यक महापालिका आयुक्त व पोलीस प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी.* रमजान महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण करण्याची प्रथा आहे. त्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात मशिदीमध्ये येतात. परंतु, यावेळी कोरोनाचा वाढता पाहता आपापल्या घरातूनच दुवा पठण करावे.* शब-ए-कदर ही पवित्र रात्र रमजान महिन्यात येत २६व्या दिवशी करण्याची प्रथा आहे.या निमित्ताने मुस्लिम नागरिक तरावीह नमाज संपल्यानंतर आपल्या विभागातील मशिदीमध्ये रात्रभर कुराण व नफील नमाज अदा करतात. परंतु,यंदा हे कार्यक्रम घरीच साजरे करावेत. * धार्मिक स्थळे बंद असल्याने वाझ कार्यक्रमाचे आयोजन शासनाच्या नियमांचे पालन करून बंद जागेत शक्यतो ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावे.* महापालिका क्षेत्रात संचारबंदी लागू असल्याने फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत व नागरिकांनी  विनाकारण रस्त्यावर फिरू नये.* रमजान महिन्यात कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका, धार्मिक, सामाजिक , सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. * धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लिम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते,राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्था यांच्या मार्फत पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याच्या उद्देशाने जनजागृती करावी. * महाराष्ट्र शासन,गृह विभाग, महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. * संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश व मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याRamzanरमजानMuslimमुस्लीम