शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 13:31 IST

निविदा प्रक्रिया वेळेत न राबविल्याने पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे-नाले आणि मुळा-मुठा नदीतील जलपर्णी यंदा काढली गेली नाही.

ठळक मुद्देजलपर्णीमुळे मुठा नदीच्या प्रवाहाला अडथळा पुराचा धोका वाढणार ; जलपर्णीमुळे डासांच्या साम्राज्यातही वाढ

पुणे : महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे कोट्यवधी रुपयांची तरतुद करुन देखील केवळ निविदा प्रक्रिया वेळेत न राबविल्याने पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे-नाले आणि मुळा-मुठा नदीतील जलपर्णी यंदा काढली नाही. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे ओढ्या-नाल्यांना पूर आला असून मोठ्या प्रमाणात पाणी मुठा नदीच्या पात्रात येत आहे. परंतु, यासोबत प्रचंड मोठ्या प्रमाणात जलपर्णी देखील पाण्यासोबत वाहून येत असून, ही वाहून आलेले जलपर्णी ओंकारेश्वर मंदिर घाट परिसरामध्ये छोट्या पुलामुळे अडली आहे. परंतु यामुळे मुठा नदीच्या प्रवाहालाच अडथळा निर्माण झाला असून, भविष्यात मोठा पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यात या जलपर्णीमुळे संपूर्ण शहरामध्ये डासांच्या साम्राज्यात वाढ झाली असून, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. महापालिका प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वी दरवर्षी शहरातील सर्व ओढे-नाले, मुळा-मुठा नदीतील जलवर्णी काढण्यात येते. परंतु यंदा जलपर्णी काढण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व मशनिरी पुरवण्याचे संपूर्ण बजेट मोटार वाहन विभागाला देण्यात आले आहे. परंतु जलपर्णी काढण्यासाठीची निविदा प्रक्रिया वेळेत राबविण्यात आली नाही. यामुळे  तब्बल पावणेचार कोटी रुपयांची तरतुद करुन देखील यंदाचा पावसाळा जलपर्णी न काढल्याने पुणेकरांच्या जिवावर बेतण्याची शक्यता असल्याचे वृत्त दैनिक लोकमतमध्ये प्रसिध्द केले होते. याचा प्रत्यय पुणेकरांना आला असून, मुठा नदीच्या ओंकारेश्वर मंदिर येथील घाटालगत प्रचंड मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून आली आहे. यामुळे नदीचा प्रवाहलाच अडथळा निर्माण झाल्याने, उशीरा जाग आलेल्या प्रशासनाने तातडीने तीन-चार मशीन लावून भर पावसात जलपर्णी काढण्याचे काम सुरु केले आहे. ---ही जलपर्णी काढतानही महापालिकेचा ‘अविवेक’पावसाळ््यापूर्वी महापालिकेने शहरातील ओढे-नाले आणि नदी पात्रातील जलपर्णी न काढल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे ओढे-नाले तुडुंब वाहत असून, नदी मुठा नदी पात्राच्या पाणी पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. परंतु या पाण्यासोबत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जलपर्णी वाहून आली असून, महापालिकेच्या मुख्य इमारतीलगत असलेल्या ओंकारेश्वर घाट येथेली छोट्यापूलाला अडकून अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे प्रशासनाकडून तातडीने भर पावसामध्ये तीन-चार मशीन लावून जलपर्णी काढण्याचे काम सुरु आहे. परंतु ही जलपर्णी काढताना देखील काम चालाव पणा सुरु असून, अविवेक पध्दतीने नदी पात्राच्या बाहेर न काढता पुन्हा नदी पात्रामध्येच पुलाच्या पुढील बाजून टाकण्यात येत आहे. यामुळे पुन्हा मुठा नदीमध्ये पुढे कुठे तरी ही जलपर्णी वाहून जाऊन पुढील असणारी गावांमध्ये पुराचा धोका निर्माण होऊ शकतो.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाHealthआरोग्य