शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची वाहनतळे होणार खुली,प्रशासनाचा विचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 15:54 IST

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहनांची वर्दळ वाढली.

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बंद असलेले उद्योग व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहेत. बाजारपेठही सुरू होऊ लागल्या असून रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे पालिकेने वाहनतळे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या मालकीची ही वाहनतळे येत्या दोन दिवसात खुली होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर २४ मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर जसजशी कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढली तसतसा लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आले. त्यानंतर कंटेन्मेंट झोनही तयार करण्यात आले. नागरिकांना बाहेर पडता येत नसल्याने रस्ते ओस पडले होते. रस्त्यावर वाहनांची अजिबात वर्दळ नव्हती. सर्व व्यवहार, दुकाने, व्यापार, व्यवसाय आणि नोकरीची ठिकाणे, कार्यालये बंद असल्याने नागरिकही बाहेर पडत नव्हते. लॉकडाऊनच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यांमध्ये मात्र कंटेन्मेंट झोन वगळता अन्य ठिकाणी काही प्रमाणात सवलती देण्यात आल्या. अत्यावश्यक सेवांसह अन्य सेवाही सुरू करण्यात आल्या. पालिकेची विकासकामे हळूहळू सुरू करण्यात आली आहेत. लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू करतानाच केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार आणखी सवलती दिल्या जाण्याची शक्यता असून कंटेन्मेंट झोनमध्ये कडक उपाययोजना केल्या जाणार आहेत. शहरातील बऱ्यापैकी दुकाने, व्यवसाय आणि उद्योग सुरू झाले आहेत. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असून खासगी कार्यालयेही सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात नागरिकांची वर्दळ वाढली असून वाहनांची संख्याही वाढू लागली आहे. पार्किंगचा प्रश्न पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. यासोबतच ज्यांनी पालिकेची वाहनतळ निविदा काढून चालविण्यास दिली आहेत त्या ठेकेदारांचे नुकसान होत असून मनुष्यबळाच्या रोजगाराचा प्रश्नही आहे. त्यापार्श्वभूमीवर पालिकेच्या मालकीच्या २६ वाहनातळापैकी कंटेन्मेंट झोन वगळता उर्वरीत सर्व वाहनतळे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणती वाहनतळे सुरू करायची याची यादी निश्चित केली जाणार असून येत्या दोन दिवसात ही वाहनतळ सुरू करण्यात येणार आहेत. ----------- महापालिकेच्या मालकीची वाहनतळे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाहनतळे सुरू केल्याने पार्किंगसाठी पुन्हा जागा उपलब्ध होणार आहे. कंटेन्मेंट झोन वगळता अन्य वाहनतळे सुरू केली जाणार असून त्याची यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन दिवसात ही वाहनतळे सुरू होणार आहेत. - राजेंद्र मुठे, उपायुक्त, मालमत्ता व्यवस्थापन विभाग

टॅग्स :PuneपुणेParkingपार्किंग