शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
2
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
3
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
4
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
5
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
6
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवयाला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
7
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
8
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
9
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
10
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
11
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
12
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
13
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
14
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
15
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
16
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
17
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
18
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
19
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?

Video: पुणे महापालिकेचा अनाधिकृत हॉटेल, बार, पबवर हातोडा; एका दिवसात L ३ पबसह २९ ठिकाणी कारवाई

By राजू हिंगे | Updated: June 25, 2024 20:33 IST

कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणानंतर थंडावलेली कारवाई पालिकेकडून पुन्हा सुरु करण्यात आली

पुणे: शहरातील हाॅटेल, बार आणि पब मध्ये मोठया प्रमाणात बेकायदेशीरपणे ड्रग्स आणि मद्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर  फग्यसन कॉलेज रस्ता, शिवाजीनगर आणि खराडी येथील हॉटेल, पब, बार आणि रेस्टॉरट यांच्या फ्रंट आणि साइड मार्जिन मध्ये विनापरवाना उभारण्यात आलेल्या शेडवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई केली. एल ३ पबसह २९ ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३६ हजार ८४५ चौरस फुट क्षेत्र रिकामे करण्यात आले. 

गेल्या  महिन्यात कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरणानंतर महापालिकेने शहरात रूफ टाॅप हाॅटेल, हाॅटेल तसेच अनधिकृत पबच्या बांधकामांवर कारवाईचा बडगा उभारला होता. या कारवाईत सुमारे १४४ हाॅटेलवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई थंडावली होती. मात्र, पुन्हा मंग़ळवारी थेट राज्यसरकारकडुन सूचना आल्याने महापालिकेकडून सकाळ पासूनच फर्गुसन रस्त्यापासून कारवाईस सुरूवात करण्यात आली. दिवसभरात बाणेर, खराडी, औंध, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर या भागात अनधिकृत बांधकाम निर्मूलन पथकाने जोरदार कारवाई  केली.  या कारवाईत  ९ हॉटेल, पब, बार आणि रेस्टॉरट यांच्या फ्रंट आणि साइड मार्जिन मध्ये कारवाई केली.  एल ३ पब मध्ये ड्रग्जची पार्टी झाली होती. त्या पबवर पालिकेने कारवाई केली. या पबचे अनाधिकृत बांधकाम तोडण्यात आले 

गुन्हा दाखल करण्यास सुरवात , कारवाई यापुढे सुरूच ठेवणार 

पुणे महापालिकेच्या बांधकाम विभाग सातत्याने  हॉटेल, बार आणि रेस्टॉरट यांच्यावर कारवाई करतो. पण त्यानंतर संबंधित हॉटेल चालक आणि मालक हे पुन्हा अतिक्रमण करतात. त्यामुळे पालिकेने या हॉटेलवर गुन्हा दाखल करणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे.  महापालिका यापुढे अशीच  कारवाई च सुरू ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

एरवी बंदोबस्त न देणारे पोलिस स्वताहुन फोन करत होते 

शहरातील अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी पालिकेला पोलिसाचा बंदोबस्त घ्यावा लागतो. या बंदोबस्तासाठी पालिकेला पोलिसाकडे सातत्याने मागणी करावी लागते. पण आज पोलिस स्वताहुन पालिकेच्या बांधकाम विभागाला कुठे कारवाई करायची आहे बंदोबस्त हवा आहे का याची विचारणा करत होते. 

कारवाई केलेले ठिकाण, क्षेत्र 

हॉटेल द अर्बन हारवेस्ट वडगाव बुद्रक १ हजार १२५ चौरस फुट, ७ अ रेस्टोरट बार खराडी ३ हजार चौरस फुट, स्पाईन फक्टरी खराडी २हजार ५०० चौरस फुट,   माफिया बार आणि रेस्टॉरंट खराडी १ हजार  चौरस फुट,  बालेवाडी हाय स्ट्रीट आयन बार ३ हजार २०० चौरस फुट,द आर्बन फॉडरी ,  टेटुलिया बॅरिस्टो, नबाब एशिया ४ हजार ८०० चौरस फुट, पार्क ग्रॅडूअर इमारत, टेल्स ॲन्ड स्पीरीट, हॅप्पी ॲण्ड हार्ट, द इनडिपेडस डे ९०० चौरस फुट, बटर ॲन्ड बार  २हजार ५०० चौरस फुट , एल ३ हॉटेल शिवाजीनगर १२५ चौरस फुट, सुप्रिम स्नडविच कॉर्नर  शिवाजीनगर ४०० चौरस फुट, चैतन्य पराठा हॉउस ८२५ चाैरस फुट,  हॉटेल ग्रीन सिग्नल आपटे रोड ६०० चौरस फूट, हॉटेल वैशाली ५हजार चौरस फुट, शिरोळे मॉल  उमेश शिरोळे ६ हजार ७४५ चाैरस फुट, नफीस सौदागर  ५२०चौरस फूट,  संतोष जाधव २४० चौरस फूट, युसूफ शेख ६९्०चाैरस फुट, एन.व्ही. बांदल १८० चाैरस फुट, मयुर जोशी ३०० चाैरस फुट, तुषार गवारे २२५ चाैरस फुट, कमलेश यादव ४५० चाैरस फुट, सुमित चांदणे कुणाल नागवडे ३५० चाैरस फुट, साईनाथ सायकल मार्ट ४०० चाैरस फुट, नफिस सौदागर ३५० चाैरस फुट

 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थhotelहॉटेल