शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या पवित्र्याने भाजपाची घबराट; पुणे महापालिकेची सभा केली तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 16:31 IST

विरोधकांचा आंदोलनाचा पवित्रा लक्षात घेऊन सत्ताधारी भाजपाने महापालिकेची सभा अचानक तहकूब केली. शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या दोन महत्त्वाच्या विषयांवर होते खास सभा आयोजित करण्यात आली होती.

ठळक मुद्देशहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर आयोजित करण्यात आली होती खास सभा अशा तहकुबीने महत्वाचे विषय लांबणीवर पडतात; काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले मत

पुणे : विरोधकांचा आंदोलनाचा पवित्रा लक्षात घेऊन सत्ताधारी भाजपाने महापालिकेची सभा अचानक तहकूब केली. शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या दोन महत्त्वाच्या विषयांवर खास सभा आयोजित करण्यात आली होती.भाजपा नगरसेवकांच्या पतींची महापालिकेतील शिरजोरी वाढतच चालली आहे. एका नगरसेविकेच्या पतीने अभियंत्याच्या कार्यालयात त्यांच्या खुर्चीला बुधवारी लाथ मारली. या ताज्या प्रकरणाशिवाय पाणी योजनेतील मीटर खरेदीवरून भाजापाच्या नगरसेवकांमध्येच फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. हा विषय सभेत काढण्यात येणार होता. तसेच अन्य काही विषयांवर विरोधक आंदोलन करणार असल्याची कुणकूण लागल्याने सभा सूरू होताच सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी काही सेकंदातच तहकुबीची सूचना मांडली. महापौर मुक्ता टिळक यांनाही याची कल्पना नव्हती. त्यामुळे भिमाले यांनी त्यांना वर जाउन माहिती दिली.सर्व गटनेत्यांनी तहकुबीचा निर्णय घेतला असे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी मात्र सभेनंतर पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट शब्दात याचा इन्कार केला. तहकुबीच्या सूचनेला विरोधी पक्षनेत्याचे अनुमोदन असते, ते नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. अधिकाऱ्यांना आता संरक्षण हवे अशी मागणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे योगेश ससाणे भैया जाधव कमांडोच्या गणवेशात आले होते. सभा तहकुबीने त्यांचा हिरमोड झाला. गफुर पठाण हे सदस्य घनकचरा उपविधी व सायकल शेअरिंग या दोन्ही विषयांवर बोलण्यासाठी मुद्दे काढून आणले होते. त्यानीही सभा तहकुबी बद्दल संतप्त भावना व्यक्त केल्या. भाजपाच्या धिरज घाटे दिपक पोटे यांनी सभा तहकुबी सर्वांच्या विचारानेच ठरली होती असे सांगितले.दरम्यान प्रशासनामध्यही सभा अचानक तहकूब केल्याने नाराजी होती. सदस्य अभ्यास झाला नाही असे कारण देतात मात्र सभेच्या आठ ते तीन दिवस आधी सर्व सदस्याना विषयाची लिखीत माहिती दिली जाते. अशा तहकुबीने महत्वाचे विषय लांबणीवर पडतात असे मत काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपा