शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पुणे महापालिकेने शहरातील २६ पैकी सुरु केली पाच वाहनतळं; रस्त्यावरील वर्दळ वाढल्याने निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 16:18 IST

बंद असलेले उद्योग व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे.

ठळक मुद्देउर्वरीत टप्प्याटप्प्याने होणार सुरु ; काही ठिकाणी विलगीकरण कक्षकंटेन्मेंट एरियामधील तसेच या भागालगत असलेली वाहतनळं तूर्तास सुरु न करण्याचा निर्णय

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट मिळाल्यानंतर शहरातील व्यवसाय आणि खासगी कार्यालये सुरु झाली आहेत. नागरिक खरेदी व दैनंदिन कामकाजासाठी बाहेर पडू लागले आहेत. नागरिकांच्या वाहनांना पार्किंग उपलब्ध करुन देण्याकरिता महापालिकेने वाहनतळं सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या मालकीच्या २६ वाहनतळांपैकी पाच वाहनतळं सुरु करण्यात आली असून उर्वरीत वाहनतळं टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहेत.        बंद असलेले उद्योग व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर २४ मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर जसजशी कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढली तसतसा लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आले. त्यानंतर कंटेन्मेंट झोनही तयार करण्यात आले. नागरिकांना बाहेर पडता येत नसल्याने रस्ते ओस पडले होते. रस्त्यावर वाहनांची अजिबात वर्दळ नव्हती. सर्व व्यवहार, दुकाने, व्यापार, व्यवसाय आणि नोकरीची ठिकाणे, कार्यालये बंद असल्याने नागरिकही बाहेर पडत नव्हते. लॉकडाऊनच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यांमध्ये मात्र कंटेन्मेंट झोन वगळता अन्य ठिकाणी काही प्रमाणात सवलती देण्यात आल्या. अत्यावश्यक सेवांसह अन्य सेवाही सुरू करण्यात आल्या. पालिकेची विकासकामे हळूहळू सुरू करण्यात आली आहेत.         लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू करतानाच केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आणखी सवलती दिल्या जाण्याची शक्यता असून कंटेन्मेंट झोनमध्ये कडक उपाययोजना केल्या जाणार आहेत. शहरातील बºयापैकी दुकाने, व्यवसाय आणि उद्योग सुरू झाले आहेत. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असून खासगी कार्यालयेही सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात नागरिकांची वर्दळ वाढली असून वाहनांची संख्याही वाढू लागली आहे.======ही वाहनतळं झाली सुरु

हमालवाडा कुमठेकर रस्ता, नारायण पेठ७०९/७१० कुमठेकर रस्ता, नारायण पेठभानूविलास पार्किंग नारायण पेठपीएमपीएमएल टर्मिनस कात्रजतुकारामशेठ शिंदे वाहनतळ पुणे स्टेशन======मंडई परिसरातील मिनर्व्हा-आर्यन ही वाहनतळंही लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. फर्ग्युसन रस्त्यालगत असलेल्या शिरोळे रस्त्यावरील दोन वाहनतळांसह रास्ता पेठेतील राजर्षी शाहू महाराज उद्यान, अल्पना सिनेमागृहासमोरील वाहनतळ, सारसबागेजवळील नवलोबा मंदिर वाहनतळ, सातारा रस्त्यावरील डिसीजन टॉवर पार्किंग सुद्धा सुरु करण्यात येणार आहे.

======कंटेन्मेंट एरियामधील तसेच या भागालगत असलेली वाहतनळं तूर्तास सुरु न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, गणेश कला क्रिडासह आण्णाभाऊ साठे सभागृह येथे विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आलेला असल्याने ही वाहनतळे बंद राहणार आहेत. तर, औंधचे भीमसेन जोशी कलादालन, बालगंधर्व रंगमंदिर, पेशवे उद्यान, राजीव गांधी उद्यान, कात्रज येथील वाहनतळं बंदच ठेवण्यात येणार आहेत.  

टॅग्स :PuneपुणेParkingपार्किंगPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस