शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

पुणे महापालिकेचा कारभार ‘दादां’च्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 23:00 IST

खासदार गिरीश बापटांचा गट उपेक्षित

ठळक मुद्देसभागृह नेते - स्थायी अध्यक्षांची निवड भाजपाच्या नगरसेवकांची संख्या तब्बल ९९

पुणे : महापालिकेतील खांदेपालट होत असतानाचा दुसऱ्या बाजूला शहरातील भाजपाची आणि महापालिकेतील राजकारणाची सूत्रं ‘कोथरुड’च्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत. महापौरपद कोथरुड मतदार संघाकडे गेल्यानंतर सभागृह नेतेपद आणि स्थायी समिती अध्यक्षपद कसबा मतदार संघाकडे देण्यात आलेले असले तरी ही पदे देताना ती बापट गटाकडे जाणार नाहीत याचीही दक्षता घेण्यात आली. या दोन्ही पदांच्या नेमणुकीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचेच वर्चस्व पुन्हा दिसून असून पालिकेचा कारभार आता ‘दादां’च्या हाती आला आहे. पालिकेमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आहे.

भाजपाच्या नगरसेवकांची संख्या तब्बल ९९ आहे. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आठही मतदार संघांमध्ये भाजपाचे आमदार निवडून आले होते. त्यानंतर शहरातील राजकीय समीकरणे बदलत गेली. भाजपामध्ये २०१७ सालच्या महापालिका निवडणुकांच्या काळात मोठया प्रमाणावर ‘इनकमिंग’ही झाले. यामध्ये खासदार संजय काकडे अधिक सक्रिय दिसून आले. बाहेरुन आलेल्यांपैकी बहुतांश उमेदवार निवडूनही आले. पालिकेत सत्ता आल्यानंतर आपसूकच काकडे आणि बापट असे दोन गट भाजपामध्ये उघडपणे दिसत होते. यामध्ये २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत भर पडली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरुडमधून उमेदवारी देण्यात आल्यानंतर पाटील शहरात सक्रिय झाले. तत्पुर्वी गिरीश बापट यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करुन दिल्लीला पाठविण्यात आले. हा एकप्रकारे त्यांची शहर संघटनेवरील पकड कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, पालिकेतील अनेक नगरसेवकांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे राबता वाढविला. विधानसभेसाठी कोथरुडमधून नगरसेवक मुरलीधर मोहोळ, कसबा मतदार संघामधून महापौर मुक्ता टिळक यांच्यासह नगरसेवक धीरज घाटे, हेमंत रासने इच्छूक होते. टिळक यांना उमेदवारी मिळून त्या विजयीही झाल्या. परंतू, या तिघांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांची अनुक्रमे महापौर, सभागृह नेता आणि स्थायी समिती अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पाटील यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाºया मोहोळ यांची महापौरपदी वर्णी लागल्यावर पक्षाकडून सभागृह नेते आणि स्थायी अध्यक्ष, पीएमपीएमएल संचालक बदलाच्या हालचाली सुरु झाल्या. या पदांसाठी बापट आणि काकडे गट आग्रही होते. बापट गटाचे समजले जाणारे नगरसेवक महेश लडकत यांचे नाव लावून धरण्यात आले होते. यासोबतच घाटे हे सुद्धा सभागृह नेते पदासाठी आग्रही होते. कसबा मतदार संघातीलच दुसरे नगरसेवक हेमंत रासने यांनीही स्थायी समिती अध्यक्षपदासाठी ताकद लावायला सुरुवात केली होती. पालिकेमध्ये एकाच मतदार संघाला दोन महत्वाची पदे कशी द्यायची अशी चर्चा सुरु होती. त्यामुळे अन्य मतदार संघांमधील नगरसेवकांना संधी मिळेल अशी आशा होती. परंतू, भाजपाच्या १४-१५ ज्येष्ठ नगरसेवकांना विविध प्रकारची पदे देण्यात आलेली होती. त्यामुळे पदे देताना या गोष्टीचाही विचार सुरु होता. दरम्यान, घाटे की लडकत अशी स्थिती असतानाच घाटे यांचे नाव सभागृह नेतेपदाकरिता घोषित करण्यात आले. स्थायीच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे रासने यांची निवड झाली. ही दोन्ही पदे कसबा मतदार संघातील नगरसेवकांना देण्यात आली असली तरी ही पदे देताना ती बापट गटाकडे जाणार नाहीत याचीही दक्षता घेण्यात आली. त्यातच काकडे गटालाही दूर ठेवण्यात आले. पालिकेतील महापौर, सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष या पदांच्या वाटपात प्रदेशाध्यक्षांचे वर्चस्व अधोरेखीत झाले असून पालिकेचा कारभारात आता ‘दादां’चे बारील लक्ष राहणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाgirish bapatगिरीष बापटPoliticsराजकारण