शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शासकीय गाडी वापरुनही घेतला वाहनभत्ता; आता पगारातून होणार वसूली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 16:18 IST

अनेक अधिकारी शासकीय वाहनाचा वापर करीत असतानाही वाहन भत्ता घेत असल्याचे आले समोर...

पुणे : पुणे महापालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांनी शासकीय वाहने मिळूनही वेगळा वाहन भत्ता घेतला आहे. पालिकेला यामुळे लाखो रुपयांचा भुर्दंड बसला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना आता चाप लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून आतापर्यंत वाहनभत्ता म्हणून घेतलेली रक्कम वेतनामधून कपात करुन वसूल केली जाणार आहे. ,

पुणे पालिकेतील ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांना वाहन पुरविले जाते. वाहन नसल्यास वाहनभत्ता दिला जातो. वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना वाहन देण्याची अनुमती असली तरी पालिकेत मात्र हा नियम धाब्यावर बसवित अनेक अधिकारी शासकीय वाहन वापरताना दिसत आहेत. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अधिक्षक अभियंता, मुख्य अभियंता, आरोग्य प्रमुख, सहाय्यक आरोग्य प्रमुख यांना वाहन देण्याचा शिष्टाचार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाहनभत्ता म्हणून ४ हजार २०० रुपये तर, कनिष्ठ अधिकाऱ्यांना ३ हजार १५० रुपये वाहन भत्ता दिला जातो.

परंतु, अनेक अधिकारी शासकीय वाहनाचा वापर करीत असतानाही वाहन भत्ता घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, पालिकेच्या व्हेईकल डेपोकडील वाहने कोणकोणत्या अधिकाऱ्यांकडून वापरली जात आहेत याची माहिती गोळा करण्यात येणार असून ही माहिती महापालिकेच्या आयटी विभागाला पाठवली जाणार आहे. ज्या अधिकाऱ्यांकडून वाहन आणि वाहनभत्ता दोन्हीचा एकत्रित वापर केला गेला असेल अशांवर कारवाई केली जाणार असल्याचे उपायुक्त महेश डोईफोडे म्हणाले.

अनेक अधिकाऱ्यांनी तर चारचाकी वाहनाचा वापर केल्यानंतर लेखा विभागाला वाहनभत्त्या संदर्भात माहितीच दिली नाही. अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी वाहनभत्ता आणि चारचाकी वाहन वापरणाऱ्या अधिकाऱ्यांना चाप लावला आहे. यापुढे वाहन किंवा वाहन भत्ता यापैकी एकच सेवा मिळणार आहे. दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही अगरवाल यांनी दिले आहेत.===वाहनभत्ता आणि चारचाकी वापरणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करायला हवेत. महापालिकेच्या पैशांचा गैरवापर होत आहे. पैशांची वसूली करणे अथवा चौकशी करणे हा काही कारवाईचा भाग होत नाही. पालिकेच्या चौकशीमधून सक्त कारवाई होणे अपेक्षित आहे.- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाfour wheelerफोर व्हीलर