शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

महामेट्रोने भाव ‘पाडल्याने’ पुणे महापालिकेला भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 13:30 IST

४१० कोटींच्या जागेचे मूल्यांकन फक्त १५७ कोटी

ठळक मुद्देस्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गांचे काम सुरू

पुणे : महामेट्रोच्या वतीने शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामात पहिल्या टप्प्यात सुमारे साडेअकरा हजार कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यात महापालिकेला ९५१ कोटी रुपये महामेट्रोला द्यावे लागणार आहेत. हा खर्च मेट्रोला जागेच्या मोबदल्यात दिला जाणार आहे. त्यानुसार महापालिकेकडून आतापर्यंत तब्बल ४१० कोटी रुपयांच्या मूल्याच्या जागा हस्तांतरित केल्या आहेत; परंतु महामेट्रोने या जागांचे मूल्य केवळ १५७ कोटी रुपये असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शिल्लक निधी आणि जागा तातडीने देण्याची मागणी महापालिकेतर्फे करण्यात आली आहे. महामेट्रो कंपनीच्या वतीने पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गांचे काम सुरू आहे. मेट्रोच्या कामात महापालिकेची भागीदारी आहे. महापालिकेला पहिल्या टप्प्यातील सुमारे ९५१ कोटी रुपयांचा निधी जागेच्या स्वरूपात महामेट्रोला द्यायचा आहे. यासाठी महामेट्रो वारंवार लेखी पत्रे महापालिकेला देत आहे. महापालिकेने आतापर्यंत सुमारे ४१० कोटी रुपयांची जागा महामेट्रोकडे हस्तांतरित केली आहे; परंतु महामेट्रोने जागेचे मूल्याकंन अत्यंत कमी केल्याचे महापालिकेच्या लक्षात आले. यावर महापालिका प्रशासनाने तातडीने पत्र पाठवून जागांचे नेमके मूल्य कळवून मेट्रोला तंबी दिली आहे. तसेच, महापालिकेने निश्चित केलेले मूल्य अंतिम असून, त्यानुसार मेट्रोने तातडीने महापालिकेच्या हिश्शाची रक्कम सुधारित करून कळविण्याची सूचना दिली आहे. महामेट्रोने सप्टेंबरमध्येही असे पत्र पाठवून पालिकेने आतापर्यंत दिलेल्या जागांचे मूल्यांकन १५७ कोटी असल्याचे कळविले आहे. मात्र, मेट्रोने प्रकल्प २०१५मध्ये मंजूर झाल्याचे दाखवून त्या वर्षीच्या रेडीरेकनर दराने जागांचे मूल्य महापालिकेला न कळवताच निश्चित केले............महामेट्रोचा बनाव महापालिकेने हाणून पाडलामहापालिकेने महामेट्रोला हस्तांतरित केलेल्या जागांचे मूल्य सन २०१५च्या रेडीरेकनरनुसार न्श्चिित केल्याचे लक्षात येताच महापालिकेच्या भूसंपादन विभागाने त्यावर तीव्र अक्षेप घेतला. सन २००८च्या जागावाटप नियमानुसार जागा हस्तांतरित करताना अथवा भाडे कराराने देताना चालू

रेडीरेकनरनुसारच दर गृहीत धरण्याची तरतूद आहे. जिल्हा प्रशासनानेदेखील चालू बाजार मूल्यांकनानुसारच महामेट्रोला जागा हस्तांतरित केल्या आहेत. त्यामुळे पूर्वी जमा दाखवलेली रक्कम १५७ कोटींऐवजी ४१० कोटी म्हणून महापालिकेच्या हिश्शात नमूद करून तसे पत्र सादर करावे, अशी सूचनावजा आदेश महापालिकेने महामेट्रोला दिले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका