शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

पुणे महापालिकाच म्हणतेय, पीएमपीने तिकीट दरवाढ करावी..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 13:07 IST

- गेल्या आठ वर्षांपासून तिकीट दरवाढ नाही - संचलनातील तूट भरून काढण्यासाठी महापालिकेला द्यावी लागते ६० टक्के रक्कम

पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्ती वेतन, सीएनजी गॅस, भाडे कराराच्या बसचे भाडे ठेकेदारांना देणे, यासह अन्य कारणांनी दरवर्षीचा खर्च १४०० कोटी पेक्षा जास्त आहे. उत्पन्न मात्र केवळ ७०० ते ७२५ कोटी रुपये आहे. पीएमपीच्या उत्पन्नापेक्षा खर्च हा दुप्पट हाेत असून, हा तोटा दरवर्षी वाढतच आहे. या तोट्यातील ६० टक्के रकमेची भरपाई महापालिका देते. दुसरीकडे पीएमपीची २०१६ नंतर म्हणजे गेली ८ वर्षे तिकीट दरवाढ झालेली नाही. त्यामुळे पीएमपीने तिकीट दरवाढ करावी, अशी मागणी महापालिकेकडून केली जाणार आहे.पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीमध्ये पीएमपीची बससेवा पुरविली जाते. सध्या ताफ्यात २१०० बस असून, त्यापैकी सुमारे ४५० बस नादुरुस्त व अन्य कारणांनी डेपोमध्ये असतात. सुमारे १६५० बस दररोज प्रवासी सेवेसाठी उपलब्ध असतात. ही बससंख्या अपुरी असली तरी दररोज सुमारे १३ लाख प्रवाशांना प्रवासासाठी पीएमपीचा आधार महत्त्वाचा आहे. पीएमपी कंपनी स्थापन होताना खर्चाचा डोलारा सहन होणार नसल्याने या कंपनीला पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांनी त्यांचा तोटा भरून द्यावा, असा निर्णय झालेला आहे. त्यानुसार एकूण तोट्याच्या ६० टक्के रक्कम पुणे महापालिका, तर ४० टक्के रक्कम पिंपरी-चिंचवड महापालिका देत आहे. पीएमआरडीएने देखील त्यांच्या हद्दीतील सेवेसाठी पैसे दिले पाहिजेत, असा निर्णय झालेला असला तरी अद्याप एकाच वर्षाचे पैसे जमा झालेले आहेत.आठ वर्षे तिकीट दरवाढ नाहीपीएमपीची शेवटची तिकीट दरवाढ ही २०१६ मध्ये झालेली आहे. पहिल्या टप्प्यास ५ रुपये, दुसऱ्या टप्प्यास १० रुपये अशी पाचच्या टप्प्यामध्ये ही तिकीट दरवाढ झाली आहे. २०२४ हे वर्ष संपत आले आहे. जवळपास ८ वर्षांपासून पीएमपीची तिकीट दरवाढ झालेली नाही.                                   

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड