शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात तेरावा महिना! ऐन कोरोनाच्या काळात पुणे पालिकेचे दोन्हीही आरोग्यप्रमुख रजेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 19:51 IST

पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग 'ऑक्सिजन'वर

ठळक मुद्देमहापालिकेच्या आरोग्य विभागाचे दोन्हीही आरोग्य प्रमुख तब्येत बरी नसल्याने गेले आहेत रजेवर

पुणे : कोरोनासोबत मुकाबला करीत दिवसरात्र काम करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही आता आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दोन्हीही आरोग्य प्रमुख तब्येत बरी नसल्याने रजेवर गेले आहेत. ऐन कोरोना काळात हा विभागच जायबंदी होत असल्याचे दिसत आहे.राज्य शासनाने महापालिकेच्या मदतीकरिता आरोग्य प्रमुख म्हणून पाठविलेल्या डॉ. नितीन बिलोलीकर हे मागील 15 दिवसांपेक्षा अधिक काळापासून रजेवर गेलेले आहेत. पालिकेत हजर झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस काम केलेल्या बिलोलीकर यांनी काही बैठकांनाही हजेरी लावली होती. परंतू, त्यांचे वय 60 पेक्षा अधिक असल्याने त्यांना कामाचा ताण जाणवू लागला होता. काही दिवसांनी त्यांची तब्येत बिघडली. उपचारांसाठी ते रजेवर गेले.दरम्यान, दोन वर्षांपासून पालिकेचे आरोग्य प्रमुख असलेले डॉ. रामचंद्र हंकारे हे सुद्धा कामाच्या ताणामुळे अधूनमधून आजारी पडत होते. गेल्या आठवड्यापासून त्यांना बरे वाटत नव्हते. त्याही स्थितीत ते कामावर येत होते. परंतू, दोन दिवसात त्यांना खुपच जास्त अशक्तपणा आला. तब्येत आणखी बिघडू नये याकरिता त्यांनी रजा टाकली असून पुढील आठवडाभर ते रजेवर आहेत.दोन्हीही आरोग्य प्रमुख रजेवर आहेत. त्यामुळे आरोग्य प्रमुख पदाचा तात्पुरता पदभार सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आरोग्य प्रमुख रजेवर असले तरी सर्व कामे व्यवस्थित आणि नेहमीप्रमाणे सुरु असल्याचे साबणे यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाHealthआरोग्यMedicalवैद्यकीय