शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

पुणे महापालिकेला सर्वात जास्त कर आमच्या भागाचा, तरी जलपर्णीचा त्रास आमच्याच वाट्याला का.?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 19:40 IST

महापालिकेला सर्वात जास्त 'कर' जर आमच्या परिसरातून जात असेल तर आमच्या आरोग्याशी खेळ का..?

पुणे: पुणे शहरात दरवर्षी जलपर्णीचा मुद्दा ऐरणीवर येतो. नदीतील जलपर्णीमुळे नागरिकांच्या आरोग्यासह नदीतील जलचर प्राण्यांच्या जीविताला देखील धोका निर्माण होतो. मात्र, महापालिकेच्या प्रशासन यंत्रणा जोवर नागरिकांकडून जलपर्णीबाबत तक्रारींचा भडीमार होत नाही तोपर्यंत या मुद्द्याला गांभीर्याने घेत नाही हेच चित्र पाहायला मिळते. कोरेगाव पार्क,बोट क्लब रोड, बंड गार्डन परिसरातील राहिवाशांनी आता जलपर्णीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत प्रशासन यंत्रणेवर आगपाखड केली आहे. 

कोरेगाव पार्क, बंड गार्डन, बोट क्लब रोड या परिसरातील नागरिकांना दरवर्षी जलपर्णीच्या त्रास होत असतो. त्रस्त नागरिक दरवर्षी संबंधित ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार करतात.त्यानंतर महापालिका यंत्रणा सुरुवातीला काही कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी औषध फवारणीसाठी पाठवते. काही दिवसांनी मग नदीपात्रातील जलपर्णी काढण्यास सुरुवात होते. मात्र, त्याआधी काही महिने तेथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. दरवर्षीच हीच समस्या उद्भवत असल्यामुळे यंदा नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. 

याबाबत रहिवाशी सती नायर म्हणाल्या, नदीपात्रात दरवर्षी, जानेवारी वा फेब्रुवारी दरम्यान जलपर्णी निर्माण होते. नंतर मार्च एप्रिल या कालावधीत तर तिचा विस्तार इतक्या मोठ्या प्रमाणात होतो की सर्वच अवघड होते. नदीत सर्वत्र जलपर्णीचेच साम्राज्य दिसू लागते.पण दरवर्षी जर ही समस्या उद्भवत असेल तर महापालिका प्रशासन यंत्रणा मार्च एप्रिल महिना उजाडण्याची वाट का पाहते. नागरिकांच्या व जलचर प्राण्यांच्या आरोग्याशी खेळवड का करते, हेच समजत नाही.

जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षीच्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेली असते. तरीदेखील या समस्येकडे तितकेसे गांभीर्याने पाहिले जात नाही. यात अधिकारी, कंत्राटदार यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे, असेही नायर यावेळी सांगितले आहे.

या भागातील काही नागरिक म्हणाले, नदीपात्रात जलपर्णी निर्माण होण्यास सुरुवात झाली की आम्ही प्रशासनाकडे  याबाबत तक्रार करत असतो.पण ते  एप्रिलच्या उजाडेपर्यंत याकडे दुर्लक्ष करते.जर सर्वात जास्त कर महापालिकेला आमच्या भागातून भरला जात असेल तर अशी हेळसांड योग्य नाही.त्यामुळे प्रशासनाने आमचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही तर महापालिकेचा कर भरणार नाही. याविषयी महापालिकेची भूमिका जाणून घेण्याकरिता प्रशासनाशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

टॅग्स :PuneपुणेKoregaon Parkकोरेगाव पार्कriverनदीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका