पुणे महापालिका निवडणूक : २३ एस.सी. आणि २ एस.टी. प्रवर्गाचे प्रभाग आरक्षण जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 10:30 AM2022-05-19T10:30:47+5:302022-05-19T10:34:22+5:30

निवडणूक विभागाने रात्री उशिरा संकेतस्थळावर आरक्षित प्रभागांची नावे जाहीर केली आहेत...

pune municipal corporation election 23 SC and 2 st category ward reservation announced | पुणे महापालिका निवडणूक : २३ एस.सी. आणि २ एस.टी. प्रवर्गाचे प्रभाग आरक्षण जाहीर

पुणे महापालिका निवडणूक : २३ एस.सी. आणि २ एस.टी. प्रवर्गाचे प्रभाग आरक्षण जाहीर

googlenewsNext

पुणे : महापालिकेच्या ५८ प्रभागांमधील अनुसुचित जाती (एस.सी.) व अनुसुचित जमातीच्या (एस.टी.) प्रभागांचे आरक्षण बुधवारी रात्री पावणे बारा वाजता महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले. यात एस.सी. प्रवर्गासाठी २३ व एस.टी. प्रवर्गाच्या २ जागांचे प्रभाग घोषित करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांची अंतिम प्रभाग रचना आणि नकाशे १७ मे रोजी जाहीर केले. तर नेहमी प्रमाणे महापालिकेच्या निवडणूक विभागाने रात्री उशिरा संकेतस्थळावर आरक्षित प्रभागांची नावे जाहीर केली. 

५८ प्रभागात असलेल्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत असलेली एस.सी. आणि एस.टी. प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार हे आरक्षण निश्चित करण्यात आले. परंतु जोपर्यंत महिला आरक्षण जाहीर होत नाही, तोपर्यंत महिला एस.सी. आणि एस.टी.आरक्षणबाबतचे चित्र स्पष्ट होणार नाही. त्यामुळे महिला आरक्षण कधी जाहीर होणार याची उत्सुकता आता इच्छुकांना आहे. ५० टक्के महिला आरक्षणानुसार ५८ पैकी २९ प्रभागांमध्ये प्रत्येकी २ महिला उमेदवार असणार असून, एक खुल्या प्रवर्गातील तर एक आरक्षित प्रवर्गातील असणार आहे.

अनुसुचित जातीचे आरक्षित प्रभाग
प्रभाग क्र. २० - पुणे स्टेशन-मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड 
एकूण लोकसंख्या : ६७ हजार १२९ - 
अनुसुचित जाती लोकसंख्या :१९ हजार ५६२
प्रभाग क्र. ५०- सहकारनगर - तळजाई 
एकूण लोकसंख्या : ६१ हजार २४४
अनुसुचित जाती लोकसंख्या : १६ हजार ३२
प्रभाग क्र. ४८ - अप्पर सुप्पर-इंदिरानगर 
एकूण लोकसंख्या : ५६ हजार ८८४ 
अनुसुचित जाती लोकसंख्या : १४ हजार ६९१
प्रभाग क्र. ८ - कळस - फुलेनगर 
एकूण लोकसंख्या : ६२ हजार २७३ 
अनुसुचित जाती लोकसंख्या :१५ हजार ५८३
प्रभाग क्र. २७ - कासेवाडी लोहियानगर 
एकूण लोकसंख्या : ६८ हजार ५९१ 
अनुसुचित जाती लोकसंख्या : १६ हजार ६९
प्रभाग क्र. ९ - येरवडा 
एकूण लोकसंख्या : ७१ हजार ३९०
अनुसुचित जाती लोकसंख्या : १६ हजार १३९
प्रभाग क्र.११ - बोपोडी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 
एकूण लोकसंख्या : ६२ हजार २६९
अनुसुचित जाती लोकसंख्या : १३ हजार ११५
प्रभाग क्र. ७ - कल्यानीनगर-नागपुरचाळ 
एकूण लोकसंख्या : ६७ हजार ७३९ 
अनुसुचित जाती लोकसंख्या : १४ हजार १५४
प्रभाग क्र. ३७ - जनता वसाहत- दत्तवाडी 
एकूण लोकसंख्या : ६९ हजार ६७२ 
अनुसुचित जाती लोकसंख्या : १४ हजार २०९ 
प्रभाग क्र- ३८- शिवदर्शन -पद्मावती 
एकूण लोकसंख्या : ६४ हजार २२१
अनुसुचित जाती लोकसंख्या : १३ हजार ४३
प्रभाग क्र. १ - धानोरी-विश्रांतवाडी 
एकूण लोकसंख्या : ५५ हजार ४८८
अनुसुचित जाती लोकसंख्या :  १० हजार ९२७
प्रभाग क्र. ४२ - रामटेकडी-सय्यदनगर 
एकूण लोकसंख्या : ४९ हजार २५
अनुसुचित जाती लोकसंख्या : ९ हजार ३७०
प्रभाग क्र. २६ - वानवडी गावठाण-वैदुवाडी 
एकूण लोकसंख्या : ५९ हजार २०
अनुसुचित जाती लोकसंख्या : १० हजार ९९३
प्रभाग क्र. २२ - मांजरी बुद्रुक-शेवाळवाडी 
एकूण लोकसंख्या : ६१ हजार ८७८ 
अनुसुचित जाती लोकसंख्या : ११ हजार ४९४
प्रभाग क्र. १०- शिवाजीनगर गावठाण- संगमवाडी
एकूण लोकसंख्या : ६२ हजार ४८१
अनुसुचित जाती लोकसंख्या : ११ हजार ४९४
प्रभाग क्र. ३९ - मार्केटयार्ड-महर्षीनगर 
एकूण लोकसंख्या : ६० हजार ५३७ 
अनुसुचित जाती लोकसंख्या : १० हजार ८५४ 
प्रभाग क्र. २१ - कोरेगाव पार्क - मुंढवा 
एकूण लोकसंख्या : ६७ हजार ५७४ 
अनुसुचित जाती लोकसंख्या ११ हजार ७६१
प्रभाग क्र.४७ कोंढवा बु.-येवलेवाडी 
एकूण लोकसंख्या : ५४ हजार ४९२ 
अनुसुचित जाती लोकसंख्या : ९ हजार २०६
प्रभाग क्र. ४६ - मोहमंदवाडी-उरुळी देवाची 
एकूण लोकसंख्या : ५२ हजार ७२०
अनुसुचित जाती लोकसंख्या : ८ हजार २६
प्रभाग क्र.१९ - छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम- रास्ता पेठ 
एकूण लोकसंख्या : ५८ हजार ९९४ 
अनुसुचित जाती लोकसंख्या : ८ हजार ७८५
प्रभाग क्र.- ४  - पुर्व खराडी- वाघोली-
एकूण लोकसंख्या : ५८ हजार ९१२
अनुसुचित जाती लोकसंख्या : ८ हजार ५६४
प्रभाग क्र- १२ - औंध-बालेवाडी 
एकूण लोकसंख्या : ६३ हजार ३६२
अनुसुचित जाती लोकसंख्या : ८ हजार ९९६
प्रभाग क्र. ३ - लोहगाव- विमाननगर - 
एकूण लोकसंख्या : ६१ हजार ८३६
अनुसुचित जाती लोकसंख्या : ८ हजार ५९२

अनुसुचित जमाती आरक्षित प्रभाग
प्रभाग क्र.- १  - धानोरी- विश्रांतवाडी
एकूण लोकसंख्या :  ५५ हजार ४८८ 
अनुसुचित जमाती लोकसंख्या : १ हजार ६५२
प्रभाग क्र. १४ - पाषाण - बावधान बुद्रुक 
एकूण लोकसंख्या : ५७ हजार ९९५ 
अनुसुचित जमाती लोकसंख्या : १ हजार ६२८

इतर मागासवर्गाच्या (ओबीसी) आरक्षणबाबत येत्या १२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी असल्याने, मध्यप्रदेश राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही ओबीसी आरक्षण मिळण्याची दाट शक्यता आहे. पावसाळ्यात निवडणूक घेणार नाही, ही निवडणूक आयोगाची भूमिका असल्याने पुणे महापालिका निवडणूक ही सप्टेंबर नंतरच होणार आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण बाबत कार्यवाही करण्यासाठी राज्य सरकारला मोठा अवधी मिळणार आहे.

Web Title: pune municipal corporation election 23 SC and 2 st category ward reservation announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.