शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

तब्बल पाच हजार कोटींची थकबाकी पुणे महापालिका वसूल करणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 12:13 IST

उत्पन्नाला थकबाकी वसुलीचा लागणार का टेकू?

ठळक मुद्देखर्च आणि उत्पन्नाची सांगड घालण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता

लक्ष्मण मोरे पुणे : महापालिकेचे मुळातच घटलेले उत्पन्न आणि कोरोनावरील वाढता खर्च पाहता पालिकेला कसरत करावी लागत आहे. राज्य शासनाकडे सातत्याने १५० कोटींची मागणी केली जात आहे. यासोबतच पदाधिकाऱ्यांकडून नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, पालिकेची तब्बल पाच हजार कोटींपेक्षा अधिक थकबाकी वसूल होणे बाकी आहे. वर्षानुवर्षे रखडलेली ही थकबाकी वसूल करण्यात प्रशासन कमी पडत आहे. 

महापालिकेच्या मिळकत कर विभागावरच सर्व डोलारा उभा आहे. यावर्षी जवळपास साडेसहाशे कोटी रुपये मिळकत कारमधून मिळालेले आहेत. परंतु, या विभागाची साडेचार हजार कोटींची थकबाकी आहे. यामध्ये मोबाईल टॉवर्स, बडे थकबाकीदार, अनधिकृत अथवा दुबार बांधकामे आदींचा समावेश आहे. मिळकत करा खालोखाल सर्वाधिक उत्पन्न बांधकाम विभागाचे मिळते. परंतु, गेल्या दोन तीन वर्षांपासून आर्थिक मंदीमुळे या विभागाचे उत्पन्न घटले आहे. यंदा कोरोनाचा फटका बसल्याने या विभागाचे उत्पन्न अगदीच तुटपुंजे आहे. यासोबतच पाणी पुरवठा विभागाची जवळपास ५०० कोटींच्या घरातील थकबाकी आहे. मालमत्ता व्यवस्थापन विभाग, चाळ विभाग आकाशचिन्ह विभागाची कोट्यवधींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पालिकेची विविध विभागांची पाच हजार कोटींपेक्षा अधिक असलेली थकबाकी वसूल करण्यात दहा टक्के जरी यश आले तरी पालिकेला ५०० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. पालिकेचा कोरोनावर २०० कोटींपेक्षा अधिक खर्च आतापर्यंत झाला आहे. आगामी काळात उपचार आणि अन्य सुविधांवरील खर्च पाहता पालिकेला उत्पन्नात वाढ केल्याशिवाय गत्यंतर नाही. स्थायी समितीकडून सातत्याने पशासनाकडे खर्चाचा तपशील मागितला जात आहे. प्रशासनाला मिळालेल्या विशेषाधिकारात होत असलेल्या खरेदीकडेही लक्ष देण्याची आवश्यकता नगरसेवक व्यक्त करीत आहेत. त्यातच राज्य शासनाकडूनही अपेक्षित मिळत नसल्याची ओरड पालिकेतील पदाधिका-यांनी सुरु केली आहे. तुर्तास पालिकेलाच सर्व खर्च उचलावा लागत आहे. ===== मिळकत कर आणि थकबाकी वसुलीसाठी दरवर्षी सवलत देण्याची योजना आणली जाते. ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत कर न भरल्यास थकबाकीदारांच्या दारात बँड वाजविणे, नोटिसा देणे, बोजा चढविणे अशी कारवाई केली जाते. थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. - विलास कानडे, प्रमुख कर आकारणी व कर संकलन विभाग ===== पालिकेची विविध विभागांची थकबाकी वसूल करण्यासा,ठी स्थायी समितीकडून विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. आम्ही लवकरच २७ कलमी कार्यक्रम हाती घेणार असून यासंदर्भात अधिकाऱ्यांच्या बैठका लावण्यात आल्या आहेत. पालिकेला निश्चितच चांगले उत्पन्न मिळेल. - हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती ======= थकबाकीचा तपशील

मिळकत कर विभाग ४,५०० कोटी

पाणी पुरवठा विभाग -५०० कोटी मालमत्ता व्यवस्थापन चाळ विभागआकाशचिन्ह विभाग-५० कोटी

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौरcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्तMONEYपैसा