शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेला मिळेना दोन अतिरिक्त आयुक्त

By राजू हिंगे | Updated: December 25, 2024 15:13 IST

पुणे महापालिकेतील एकाच अतिरिक्त आयुक्तांवर कामाचा ताण येत आहे.

पुणे :पुणे महापालिकेतील दोन अतिरिक्त आयुक्तांची लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर एप्रिल महिन्यात बदली करण्यात आली होती. तेव्हापासुन ही दोन्ही पदे रिक्त आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार आल्यानंतर अतिरक्त आयुक्तांची दोन पदे भरली जातील असे सांगण्यात येत होते. पण अदयापही ही दोनपदे रिक्त आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेतील एकाच अतिरिक्त आयुक्तांवर कामाचा ताण येत आहे.निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपुर्वी एकाच जिल्ह्यात तीन वर्षांपासून अधिक काळ काम करणार्या प्रशासकीय आणि पोलिस अधिकार्यांची अन्य जिल्ह्यात बदली करण्यात आली. राज्यसरकारने पुणे महापालिका आयुक्त, तीन अतिरिक्त आयुक्त या आयएएस अधिकार्यांसह उपायुक्त दर्जाच्या पाच अधिकार्यांची बदली केली. बदली झालेल्या या अधिकार्यांच्या जागेवर अन्य अधिकार्यांची नियुक्ती होईल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार महापालिका आयुक्त पदावर डॉ. राजेंद्र भोसले यांची तर अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त झालेल्या तीन जागांपैकी केवळ एका जागेवर पृथ्वीराज बी.पी. यांची नेमणूक झाली. परंतू उर्वरीत दोन अतिरिक्त आयुक्त आणि पाच उपायुक्तांच्या जागा रिक्तच ठेवण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीची जूनमध्ये आचारसंहिता संपली. यानंतर उपायुक्तांच्या रिक्त जागांवर शासनातील अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली.साधारण त्याचवेळी अतिरिक्त आयुक्त पदाच्या जागाही भरण्यात येतील अशी अपेक्षा होती. परंतू विधानसभा निवडणुका होउनही नवीन सरकार स्थापन झाले आहे. तरीही अतिरिक्त आयुक्तपदाच्या दोन्ही जागा रिक्तच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडेच सर्वच विभागांचा कारभार आहे. त्यामुळे एका अतिरिक्त आयुक्तांना कारभार संभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.मर्जीतील का होईना पदे त्वरित भराराज्यात महायुतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मर्जीतील अधिकारी पुणे महापालिकेच्या अतिरक्त आयुक्तपदावर बसणार आहे. त्यासाठी काही अधिका०यांनी फिल्डींग लावली आहे. शहरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी अतिरिक्त आयुक्त पदावर मर्जीतील अधिकारी बसवा पण ही पदे लवकर भरा असे सांगत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड