शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पालिकेने 102 सोसायट्यांकडून वसूल केला सव्वाचार कोटींचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 21:07 IST

प्रतिदिन 100 किलोंपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या व आस्थापनांमध्ये कचरा जिरवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

ठळक मुद्दे प्रत्येक घरटी दंड भरण्याची तयारी सोसायटीने दर्शविल्याचीही उदाहरणे समोर

पुणे : गृहनिर्माण सोसायट्यांकडून इमारत पूर्णत्वाचा दाखला घेताना व्हर्मिकल्चर पीट अथवा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारल्याचे दाखविले जाते. परंतू, नंतर मात्र त्याठिकाणी पार्किंग अथवा तत्सम गोष्टी केल्या जातात. पालिकेने आतापर्यंत तब्बल 893 सोसायट्यांना नोटीसा बजावल्या असून 102 सोसायट्यांकडून चार कोटी 37 हजार 295 रुपयांचा दंड वसूल केला आहे. अद्यापही अनेक सोसायट्यांमधील नागरिकांचा कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध असून प्रत्येक घरटी दंड भरण्याची तयारी सोसायटीने दर्शविल्याचीही उदाहरणे समोर येऊ लागली आहेत. आतापर्यंत नोटीसा बजावण्यात आलेल्या सोसायट्यांपैकी 60 टक्क्यांच्या आसपास सोसायट्यांनी प्रकल्प सुरु करण्यास संमती दर्शविल्याचे घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले. प्रतिदिन 100 किलोंपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या व आस्थापनांमध्ये कचरा जिरवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. पालिकेने अशा सोसायट्या आणि आस्थापनांची जंत्रीच तयार केली आहे. जनजागृतीसह नोटीसा देऊन सोसायट्यांना कचरा त्यांच्याच आवारात जिरवण्याबाबत सूचनाही दिलेल्या आहेत. परंतू, अनेक सोसायट्यांनी आमच्याकडे जागाच नाहीत, पैसे नाहीत, डास होतात, उंदीर होतात-घूस लागते, दुर्गंधी येते अशी कारणे देत कचरा प्रकल्प करण्यास विरोध केला आहे. सोसायट्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तसेच कचरा जिरवल्याने कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत हे पटवून देण्यासाठी घनकचरा विभागाने सोसायट्यांसाठी प्रात्यक्षिक आणि कार्यशाळाही आयोजित केलेली होती. परंतू, त्याला अपेक्षित प्रतिसादच मिळाला नाही.  ====एका सोसायटीचे काही पदाधिकारी शुक्रवारी घनकचरा विभागामध्ये आले होते. विभागप्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांची त्यांनी भेट दिली. या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला पालिका करेल तो दंड आम्ही भरायला तयार आहोत. पण आम्हाला कचरा प्रकल्प नको असे स्पष्ट केले. त्यामुळे सोसायट्यांनी अशी भूमिका घेतली तर कचरा जिरवण्याचे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार असा प्रश्न आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका