शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-गोवा महामार्गाची गडकरींनी दिली नवी तारीख; म्हणाले, सर्व खटले मिटले...
2
युट्यूबर पत्नीला तिच्या सहकारी युट्यूबरसोबत नको त्या अवस्थेत पाहिले...; लगेचच तिने बाजुला पडलेली ओढणी...
3
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, कॉलही करणार; MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले?
4
गुगल आपले डोमेन बदलणार, तुमच्या ब्राऊझरच्या अ‍ॅड्रेस बारवर हे दिसणार...; घाबरू नका, पण सावध रहा...
5
५५ हजारांवर येण्याचं स्वप्न भंगलं; एका दिवसात सोन्याच्या दरात १३०० रुपयांपेक्षा अधिक वाढ, नवे दर काय?
6
Kitchen Tips: फळं खरेदी करताना ती आंबट आहेत की गोड, हे ओळखण्याच्या 'खास' टिप्स!
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांना कार्यक्रमाला बोलावणार? गोपिचंद पडळकरांनी स्पष्टच सांगितलं...
8
मुलीने मारला वडिलांच्याच घरावर डल्ला, नवऱ्याच्या मदतीने चोरले ९० लाख; एका चुकीने पर्दाफाश
9
मुलींकडील आयपॅड काढून घेतले, अभ्यास करायला सांगितले, आईची थेट तुरुंगात रवानगी, पोलिसांनी केली कारवाई 
10
IPL 2025 मध्ये फिक्सिंगचा प्रयत्न सुरू, खेळाडूंच्या कुटुंबीयांना केलं जातंय टार्गेट, मास्टरमाइंड कोण?
11
"आज आम्ही भोगतोय, वेळ बदलेल तेव्हा…’’ EDच्या चौकशीला हजर झालेल्या रॉबर्ट वाड्रांचं सूचक विधान   
12
"मुर्शिदाबादचा हिंसाचार सुनियोजित कट, घुसखोरांना का येऊ दिलं गेलं?"; ममतांचा सवाल
13
धमाल! आता WhatsApp वर तुम्ही ठेवू शकता मोठं स्टेटस; १ मिनिटाची लिमिट कितीने वाढवली?
14
आयएमएचा डॉ घैसासांना पाठिंबा! ही बाब अत्यंत खेदजनक, अमित गोरखेंची टीका
15
डीअर क्रिकेट, गिव्ह मी वन मोअर चान्स! क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या करुण नायरची गोष्ट
16
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' स्टॉक, झुनझुनवालांकडे आहेत १३ कोटींपेक्षा अधिक शेअर; किंमत ₹९५ पेक्षा कमी 
17
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीपासून ॐकार साधना सुरू करा आणि अगणित लाभ मिळवा!
18
१०० कोटींची ऑर्डर! "१२०० फूट खोल खाणीत...", मुलीला शेवटचा मेसेज, लक्ष्मण शिंदेंची अपहरण करून हत्या
19
तुम्हाला श्रीमंत बनवणाऱ्या SIP चे १० सीक्रेट; कोट्यधीश होण्याचे गणित समजून घ्या
20
दीड लाखाचे व्याज माफ, म्हाडाचा निकाल; बिल्डरने आकारलेली वाढीव रक्कम रद्द करण्याची सूचना

पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी पृथ्वीराज बी. पी.; डॉ. कुणाल खेमनार यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती

By राजू हिंगे | Updated: March 20, 2024 09:52 IST

डॉ. कुणाल खेमनार यांनी पुणे महापालिकेचे विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मोलाचे योगदान दिले होते

पुणे: पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी नागपूर स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. डॉ.कुणाल खेमनार यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.नागपूर स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. पृथ्वीराज बी. पी  हे २०१४च्या बँचचे अधिकारी आहेत.  

डॉ. कुणाल खेमनार यांची २१ ऑगस्ट 2020 रोजी पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. तीन वर्ष पाच महिने ते पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त होते. या कालावधीत त्यांनी पुणे महापालिकेचे विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

पृथ्वीराज बी.पी.  हे राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील ते मूळ रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गुजरातमध्ये झाले. २००४ मध्ये त्यांनी मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून (आयआयटी) अभियांत्रिकीची पदवी (बीटेक) तर २००६ मध्ये त्यांनी अहमदाबादच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून (एमआयएम) एमबीए पदवी मिळवली. २०१४ मध्ये आयएएसमध्ये निवड झाली. सोलापूर येथे परिविक्षाधीन कालावधी तर भंडारा येथे आदिवासी विकास प्रकल्प, २०१८ मध्ये परभणी येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.

 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSocialसामाजिकcommissionerआयुक्त