शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Municipal Corporation: जंगली महाराज रस्त्यावरील अनाधिकृत चौपाटीवर पालिकेचा हातोडा

By राजू हिंगे | Updated: July 4, 2024 20:07 IST

जंगली महाराज रस्त्यावर पेट्रोल पंपाच्या जागेवर असलेल्या जेएम कॉर्नर नावाच्या चौपाटीमध्ये अनाधिकृतपणे लहान मोठी सॅनक्स, हॉटेल अशी २० दुकाने सुरू होती

पुणे: शहरातील जंगली महाराज रस्त्यावर  पेट्रोल पंपाच्या जागेवर असलेल्या जेएम कॉर्नर  नावाच्या चौपाटीमध्ये अनाधिकृतपणे लहान मोठी २० दुकाने सुरू होती. या अनाधिकृत दुकानावर पालिकेने कारवाई करून पाडली. यामध्ये ३ हजार चौरस क्षेत्र मोकळे करण्यात आले.      एक महिन्यापुर्वी कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरणानंतर महापालिकेने शहरात रूफ टाॅप हाॅटेल, हाॅटेल तसेच अनधिकृत पबच्या बांधकामांवर कारवाईचा बडगा उभारला होता. या कारवाईत सुमारे १४४ हाॅटेलवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई थंडावली होती. त्यानंतर एल ३ पबमध्ये पहाटेपर्यंत पार्टी सुरु असल्याचे समोर आले. तेथे अंमलीपदार्थांचे सेवनही करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पालिकेची कारवाई सुरू  आहे.    

जंगली महाराज रस्त्यावर पेट्रोल पंपाच्या जागेवर असलेल्या जेएम कॉर्नर नावाच्या चौपाटीमध्ये अनाधिकृतपणे लहान मोठी सॅनक्स, हॉटेल अशी २० दुकाने सुरू होती. या दुकानावर पालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने कारवाई करून ३हजार ४००  चौरस फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले. जेसीबी, दोन गॅस कटर, बिगारी यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.  या दुकानदारांना १५ दिवसापुर्वी नोटीस दिली. त्यानुसार कारवाई करण्यात आली अशी माहिती  पालिकेच्या बांधकाम विभागाचे सुनिल कदम यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSocialसामाजिकMONEYपैसाhotelहॉटेल