शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चांदणी चौक पुलासाठीच्या भूसंपादनासाठी पुणे महापालिका आयुक्त बोलणार बाधित कुटुंबांशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 19:36 IST

चांदणी चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामासाठी लागणारी १३ हेक्टर जागा मिळवण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. संबधित जागामालकांशी चर्चा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देथेट चर्चा करून तडजोड करण्याचा महापालिकेकडून प्रयत्नसुमारे ११२ कुटंबे या पुलाच्या कामाने होणार बाधीत

पुणे : चांदणी चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामासाठी लागणारी १३ हेक्टर जागा मिळवण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. संबधित जागामालकांशी चर्चा करण्यात येणार आहे. त्याशिवाय बाधीत कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिका आयुक्त त्यांची शुक्रवारी बैठक घेणार आहेत.उद्घाटनानंतर या पुलाच्या कामाबाबत महापालिकेकडून काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे या कामासाठी पुढाकार घेणाऱ्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना भूसंपादनाच्या तसेच पुनर्वसनाच्या संदर्भात अडचणी सोडवण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार आता महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने खासगी जागेसंदर्भात तेथील जागामालकांशी बोलणी करण्यास सुरूवात केली आहे. भूसंपादन कायद्यानुसार जागा ताब्यात घ्यायची तर त्याला वेळ लागणार असून त्यामुळे याबाबत त्यांच्याशी थेट चर्चा करून तडजोड करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून करण्यात येणार आहे.सुमारे ११२ कुटंबे या पुलाच्या कामाने बाधीत होणार आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी महापालिकेवरच आहे. ते कसे करायचे, संबधित कुटुंबाना काय अपेक्षित आहे यासाठी महापालिका आयुक्त शुक्रवारी या कुटुंबाची बैठक घेणार आहेतउड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर कात्रज देहूरस्ता या मार्गावरील वाहतूक काही महिने पुर्ण बंद ठेवावी लागणार आहे. त्यासाठी पर्यायी रस्ता तयार करावा लागेल. काही ठिकाणी रस्ते बांधावेही लागतील. त्यालाही खासगी जागा काही काळापुरती घ्यावी लागणार आहे. किती जागा लागेल, ती कोणाची आहे याची माहिती महापालिकेकडून घेण्यात येत आहे. त्यानंतर संबधितांना त्याचा किती मोबदला, कशा स्वरूपात द्यायचा याचाही विचार केला जाईल.चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या पुलाचा मोठा उपयोग होणार आहे, मात्र महापालिकेकडून त्यातील अडचणींचा विचारच केला जात नव्हता. आता या कामाबाबत हालचाली सुरू झाल्यामुळे भूसंपादन व पुनर्वसन यातील सर्व अडथळे दूर होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. 

पुलाच्या कामासाठी एकूण १३ हेक्टर जागा लागणार आहे. त्यातील फक्त २ हेक्टर जागा महापालिकेकडे आहे. उर्वरित ११ हेक्टर जागा खासगी जागेचे संपादन करावे लागेल. ते कसे करायचे हा यातील मुख्य प्रश्न आहे. तो सोडवण्यासाठी महापालिकेने काही पर्याय तयार केले असून त्याबाबत जागा मालकांबरोबर चर्चा करण्यात येईल.- सतीश कुलकर्णी, उपायुक्त, मालमत्ता व्यवस्थापन विभाग, महापालिका 

टॅग्स :kunal kumarकुणाल कुमारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे