शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - मुंबई रेल्वे गाड्या रद्द; खासगी वाहनांचा दर झाला डबल, प्रवाशांचा मनस्ताप

By अजित घस्ते | Updated: November 26, 2023 17:13 IST

१०० रुपयात होणारा रेल्वेचा प्रवास ५०० ते ७०० रुपयापर्यंत मोजावा लागत असल्याने सामान्य प्रवाशांना नाहक त्रास

पुणे: पुणेरेल्वे विभागात पुणे-लोणावळा रेल्वेमार्गावरील शिवाजीनगर–खडकी स्टेशनदरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलिंग प्रणालीच्या विविध तांत्रिक कामांसाठी ट्रॅफिक ब्लॉक घेतल्याने रविवारी पुण्यावरून मुंबईला जाणा-या सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेससह प्रमुख गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना नाइलाजाने टॅक्सी व इतर खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. परंतु याचा गैरफायदा घेत टॅक्सी, खाजगी वाहन चालकांनी अवाच्या सवा भाडे आकारुन डबल भाडे आकरून प्रवाशांची आर्थिक लूट करत होते. त्यात एसटी बसने जाण्यासाठी शिवनेरी साठी प्रवासांची रांगच रांग लागली असल्याने रेल्व गाडया रहद्द केल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करीत डबल भाडे द्यावे लागत असल्याने रेल्वेनी गाड्या रहद केल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.  महिनाअखेरचा रविवार असल्यामुळे गावी जाणा-या प्रवाशांची गर्दी झाली होती. ब्लॅकमुळे प्रवाशांचा ओढा टॅक्सी, एसटी आणि टॅव्हल्सकडे वळला. विशेष म्हणजे दिवाळी संपल्यानंतर गावी गेलेले प्रवासी मुंबईकडे परतू लागले आहेत. त्यामुळे प्रवाशांना जाण्यासाठी खासगी गाड्यांशिवाय पर्याय नव्हता. परंतु प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे सर्व ठिकाणी गर्दी झाली होती. मुंबई मार्गावर एसटीच्या जादा गाड्या सोडले तरी प्रवाशांची गर्दी कमी होत नसे. १०० रुपयात होणारा रेल्वेचा प्रवास ५०० ते ७०० रुपयापर्यंत मोजावा लागत असल्याने सामान्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यात खासगी वाहन चालकांकडून जादा  भाडे आकारले जात होते.  

यावेळी प्रवासी गौरव कंगाले म्हणाले, मुंबईवरून पुण्याला रविवारी परीक्षा देण्यासाठी आलो. पुणे मुंबई रेल्वे गाड्या रद्द झाल्याने पुणे बस स्थानक या ठिकाणी दादरला जाण्यासाठी निघालो. इथे शिवनेरी 515 रुपये दर तर खासगी वाहने 700 ते 800 रुपये द्यावे लागत आहे. त्यातही दीड ते दोन तास रांगेत थांबून तिकीट घ्यावे लागत आहे.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpassengerप्रवासीBus DriverबसचालकMONEYपैसा