शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

E-Shivneri : ‘ई-शिवनेरी’चा पुणे-मुंबइ प्रवास धाकधुकीतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 19:44 IST

पुरेशी चार्जिंग नसल्यास मार्गावर बसच सोडू नका, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

पुणे : स्वारगेट, पुणे स्टेशन या दोन्ही आगारांतून बोरिवली, दादर आणि ठाणे या तिकाणी दर अर्ध्या तासाला ई-शिवनेरी बस धावतात. पुणे स्टेशन आणि स्वारगेट मुख्यालयात ई-शिवनेरी बस चार्जिंग केल्या जातात; पण या ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे बस फुल्ल चार्जिंग न करताच मार्गावर सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना धाकधुकीतच पुणे - मुंबइ प्रवास करावा लागत आहे. याकडे एसटी प्रशासन कधी लक्ष देणार असा सवाल प्रवासी करत आहेत.

पुण्याहून पहाटे पाच ते रात्री उशिरापर्यंत दादर, बोरिवली, ठाणे या मार्गावर अर्धाएक तासाला ई-शिवनेरी बससेवा आहे. या मार्गावर स्वारगेट येथून जवळपास ८८ आणि पुणे स्टेशन येथून दादरसाठी ३७ ई-शिवनेरी धावतात. पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांचा या आरामदायी बस प्रवासाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून स्वारगेट आणि पुणे स्टेशन भागात वीजपुरवठा खंडित होत असल्याने ई-शिवनेरी बसचे चार्जिंग पूर्ण क्षमतेने होण्यास अडचण होत आहे.त्यामुळे दुपारनंतर बस चार्जिंग नसल्यामुळे बंद पडण्याची अथवा पुन्हा चार्जिंग करण्याची वेळ येत आहे. शिवाय प्रवासातच बसमध्ये चार्जिंग कमी आहे. बस बंद पडल्यानंतर उतरावे लागेल, असे चालकांकडून वारंवार सांगितले जाते. त्यामुळे पुरेशी चार्जिंग नसल्यास मार्गावर बसच सोडू नका, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

वाहतूक कोंडी व विजेची समस्यापुणे स्टेशन आणि स्वारगेट मुख्यालयात ई-शिवनेरी बस चार्जिंग केल्या जातात. पण, या ठिकाणचा वीज पुरवठा खंडित होतो. त्याचा फटका चार्जिग करण्यावर होतो. शिवाय सकाळच्या टप्प्यात सोडण्यात आलेल्या ‘एक्स्प्रेस वे' होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे बस पोहोचायला उशीर होतो. त्यामुळे दुपारनंतर परतीच्या वेळी बस वेळेवर दाखल न झाल्यामुळे पुढील नियोजनावर परिणाम होते. शिवाय बस पुण्यात दाखल झाल्यावर चार्जिंगसाठी दोन तास वेळ लागतो. यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहावी लागते. बसची बदलाबदली दादर, बोरिवली आणि ठाणे मार्गावर सोडल्या जाणाऱ्या बस उशिरा दाखल झाल्यानंतर त्या दोन तास चार्जिंगला दुपारी लावल्या जातात. दादरला जाणारे प्रवासी जास्त असतील, तर बोरिवलीची ई-शिवनेरी त्या मार्गावर सोडली जाते. परिणामी बोरिवलीच्या बसला उशीर होतो, तर कधी-कधी ठाणे मार्गावरील बस बोरिवलीसाठी सोडली जाते. यामुळे एसटीचे वेळापत्रक बिघडत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMumbaiमुंबई