शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Pune mumbai expressway वरुन दररोज '११ हजार वाहने' टोल न देता जातात बिनधास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 16:36 IST

टोल कंपनीची व त्याला जबाबदार असणार्‍या राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांची चौकशी करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे

पुणे : कोणतेही वाहन टोल न देता जाऊ नये, अशी कडक व्यवस्था असतानाही पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावरुन दररोज तब्बल ११ हजार वाहने टोल न देता बिनधास्त जात असल्याचा दावा टोल वसुल करणार्‍या कंपनीने केला आहे. या टोल कंपनीची व त्याला जबाबदार असणार्‍या राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांची चौकशी करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे. विकास महामंडळाच्या ताब्यातील सर्व टोलनाक्यांवरुन रोज किती व कोणत्या प्रकारची वाहने जातात. ती संख्या व टोलची रक्कम यांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावरील डिसेंबर २०२१ महिन्याची आकडेवारी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या आकडेवारीत या महामार्गावरुन दररोज ११ हजार वाहने टोल न देता जात असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. 

डिसेंबर २०२१ या संपूर्ण महिन्यात ३ लाख ३० हजार ७९७ वाहनांनी टोल न भरता या महामार्गावरुन प्रवास केला आहे. त्यात सवलत आणि नियमभंग अशा दोन गटामधील वाहने असल्याचे म्हटले आहे. त्यात सवलतीची वाहने किती आणि नियमभंग करुन टोल न भरता गेलेली वाहने किती याचा वेगळा तपशील जाणीवपूर्वक देण्यात आलेला नाही.

फक्त या वाहनांना सवलत 

रुग्णवाहिका, पोलीस, मिलिटरी वाहने, आमदार, खासदार, न्यायाधीश अशांच्या वाहनांना टोलमधून सवलत देण्यात आली आहे. संपूर्ण डिसेंबर महिन्यात महामार्गावरुन १८५० बसेस, ५१९३ ट्रक, ५०८६ मल्टी एॅक्सल, २० हजार १९६ एलसीव्ही ही वाहने टोल न भरता निघून गेल्याचे दाखविण्यात आले आहे. या महामार्गावरुन प्रवास करणार्‍या कोणीही सांगू शकेल की येथील टोलनाका चुकवून कोणीही जाऊ शकत नाही. असे असताना ३ लाख ३० हजार वाहने टोल न भरता गेली, हे सर्व संशयास्पद वाटते. कंत्राटदाराकडून आलेली ही आकडेवारी रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करताना तेथील अधिकार्‍यांना यात काहीही वावगे वाटत नाही हे आश्चर्यकारक असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची चौकशी करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेलणकर यांनी पत्र लिहिले असून त्यात यापुढे सवलतीची वाहने आणि नियमभंग करुन गेलेली वाहने या दोन्ही गटाची आकडेवारी स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्याचे आदेश कंत्राटदाराला द्यावेत़ तसेच टोल चुकवून जाण्याचा हा सर्व प्रकार संशयास्पद असून त्याला जबाबदार अधिकारी व कंत्राटदार यांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक