शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे नव्या बसफेऱ्यांचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 21:00 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) शहरातील ८ प्रमुख मार्गांवर प्रत्येक मिनिटाला एक, तर अन्य तीन मार्गांवर दर दोन मिनिटाला एक बस धावेल असे नियोजन करण्यात आले आहे.

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) शहरातील ८ प्रमुख मार्गांवर प्रत्येक मिनिटाला एक, तर अन्य तीन मार्गांवर दर दोन मिनिटाला एक बस धावेल असे नियोजन करण्यात आले आहे. या शिवाय गर्दीच्या वेळी बसची संख्या वाढविणे, काही मार्गांच्या फेºयांत वाढ करणे आणि काही बसचे मार्ग वाढविण्यात आले आहेत. या बदलाची अंमलबजावणी देखील सुरु झाली असल्याची माहिती पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. कात्रज-स्वारगेट, स्वारगेट-शिवाजीनगर, मनपा भवन-निगडी, औंध-डांगे चौक, येरवडा-खराडी बायपास रस्ता, महात्मागांधी स्थानक-हडपसर रस्ता, डेक्कन-वारजेमाळवाडी आणि डेक्कन ते कोथरुड या मार्गावर दर मिनिटाला एक बस धावेल असे नियोजन करण्यात आले आहे. सिमला आॅफिस ते हिंजवडी रस्ता, कासारवाडी ते भोसरी रस्ता आणि संगमवाडी येथे विश्रांतवाडी रस्त्यावर दर दोन मिनिटाला बस धावेल. या अकरा मार्गावर एकूण १ हजार ५८२ बस १७ हजार ९६८ फेºया दर दिवशी करतील. या शिवाय शनिपार, अप्पर, स्वारगेट, कोथरुड, भारती विद्यापीठ अशा विविध १६ मार्गांवरील बसची संख्या १ पासून ५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या मार्गावरील बसची संख्या ८० वरुन ११४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. गर्दीच्या १९ मार्गावरील बसच्या संख्येत २१८ वरुन ३२१ पर्यंत वाढ करण्यात आली असून, येथील खेपा १ हजार ९९ होतील.   

महिलांसाठी ७ मार्गावर विशेष बस 

महिलांसाठी भोसरी-मनपा भवन (३१५ बस क्रमांक), निगडी-मनपा भवन (१२३), कात्रज-शिवाजीनगर (२), भेकराईनगर-मनपा (१११), कात्रज-महाराष्ट्र हौसिंग बोर्ड (२४), वारजे माळवाडी-मनपा (८२) आणि धनकवडी-न.ता.वाडी (३८) अशा ८ बस धावतील. यातील कात्रज ते शिवाजीनगर या मार्गावर २ बसच्या २४ फेºया होतील. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका