पुणे मेट्रो अद्याप यार्डातच
By Admin | Updated: May 18, 2015 05:34 IST2015-05-18T05:34:22+5:302015-05-18T05:34:22+5:30
मेट्रो भुयारी असावी, की जमिनीखालून यावर अभ्यास करून तज्ज्ञ समितीने तयार केलेला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देऊन महिना

पुणे मेट्रो अद्याप यार्डातच
पुणे : मेट्रो भुयारी असावी, की जमिनीखालून यावर अभ्यास करून तज्ज्ञ समितीने तयार केलेला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देऊन महिना होत आला त्यावर निर्णय घेण्यास त्यांना अद्याप वेळ मिळालेला नाही. मेट्रो प्रकल्प रखडल्यामुळे त्याच्या खर्चात दिवसागणिक कोट्यवधींनी वाढ होत असून त्याचा भार पुणेकरांना सहन करावा लागणाार आहे.
पुण्याच्या मेट्रोचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असतााना त्यापूर्वी वेगवान हालचाली करीत नागपूरच्या मेट्रोला केंद्र शासनाकडून मंजुरी मिळवून देण्यात आली. पुण्याचा प्रकल्प लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांच्या विसंगत भुमिकांमुळे रखडलेला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ मार्च रोजी पुण्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक घेतली. स्वारगेट ते निगडी या मेट्रोच्या मार्गाबाबत कुणाचे मतभेद नसल्याने तो प्राधान्याने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबरोबर वनाझ ते रामवाडी या मार्गावरील मेट्रो भुयारी असावी कि जमिनीखालून यावर निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री गिरीष बापट यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली. या समितीने अभ्यास करून त्याचा अहवाल देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २२ एप्रिल रोजी सुपूर्द केला आहे.
स्वारगेट ते निगडी व वनाझ ते रामवाडी या दोन्ही मार्गांचे एकत्रित प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले असल्याने त्याला एकत्रितच मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यामुळे वनाझ ते रामवाडी मार्गाच्या वादात स्वारगेट ते निगडी या मेट्रोच्या
मार्गाचेही काम सुरू करता येऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांकडे अहवाल गेल्यानंतर त्यांनी तातडीने कार्यवाही करून तो केंद्राकडे पाठविणे अपेक्षित आहे. चीनच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर अहवालावर
निर्णय घ्यावा अशी मागणी
व्यक्त केली जात आहे.(प्रतिनिधी)