पुणे मेट्रोला मिळाले केंद्राकडून ९५० कोटी

By Admin | Updated: February 2, 2017 04:09 IST2017-02-02T04:09:35+5:302017-02-02T04:09:35+5:30

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ९५० कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून बुधवारी करण्यात आली. मेट्रोच्या कामाला

Pune metro gets Rs. 95 crores from the center | पुणे मेट्रोला मिळाले केंद्राकडून ९५० कोटी

पुणे मेट्रोला मिळाले केंद्राकडून ९५० कोटी

पुणे : केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ९५० कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून बुधवारी करण्यात आली. मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली असून निधीच्या तरतुदीमुळे याला आणखी गती येणार आहे.
डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे भूमिपूजन झाले. कामाला वेगाने सुरुवात झालेली आहे. शहरामध्ये वनाझ ते रामवाडी व पिंपरी ते स्वारगेट असे ३१ किमी लांबीचे मेट्रोचे दोन मार्ग कार्यान्वित होणार आहेत. अर्थसंकल्पामध्ये मेट्रोसाठी भरीव तरतूद झाल्याने कामे आता अधिक गतीने मार्गी लागू शकतील, असा विश्वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला आहे.
मेट्रो मार्गावर सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. पुढच्या महिन्यात पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या मागार्साठी टेंडर प्रक्रिया सुरू होणार आहे. मेट्रोसाठी भूसंपादन वेगाने झाल्यास कामाला आणखी गती येईल.

- मेट्रोच्या पहिल्या टप्प्यासाठी ११ हजार ४२० कोटी रुपये खर्च येणार असल्याचे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. त्यापैकी, ५० टक्के रक्कम केंद्र-राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे. उर्वरित ५० टक्के कर्जरूपाने उभारली जाणार आहे. केंद्राच्य वाट्याची रक्कम मिळाली आहे.

Web Title: Pune metro gets Rs. 95 crores from the center