शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Metro: पुणे मेट्रोच्या 'बुधवार पेठ मेट्रो स्टेशन' हे नाव बदलण्याची शक्यता; स्थानक 'या' नावाने ओळखले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 15:26 IST

शहरातील बुधवार पेठ मेट्रो स्थानकाच्या नावात चूक झाल्याचे महामेट्रोच्या प्रकल्प अहवालातून समोर आले

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड मेट्रो स्थानकावरून नाव बदलण्याची मागणी सुरु आहे. पिंपरी चिंचवडमधील भोसरी स्टेशनच्या नावावरून नवा वाद निर्माण झाला होता. या भागातील भोसरी स्टेशनचे नाव बदलण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानंतर शहरातील बुधवार पेठ मेट्रो स्थानकाच्या नावात चूक झाल्याचे महामेट्रोच्या प्रकल्प अहवालातून समोर आले होते. 

पुण्यातील मध्यवर्ती भागात येणाऱ्या बुधवार पेठेत मेट्रो स्थानक तयार होणार होते. त्यानुसार महामेट्रोच्या प्रकल्प अहवालात बुधवार पेठ मेट्रो स्टेशन नाव देण्यात आले. मात्र जागेअभावी बुधवार पेठेत स्टेशन तयार करणं अवघड होते. त्यामुळे ते हलवून कसबा पेठेत साततोटी पोलीस चौकीजवळ स्थानकाचे काम सुरु करण्यात आले. परंतु अहवालात मात्र स्थानकाच्या नावाचा बदल केला नाही. दोन्ही पेठांमध्ये बरेच अंतर असल्याने या स्थानकाचे नाव चुकीचं असल्याचे समोर आले आहे.   बुधवार पेठ नाव बदलण्याची शक्यता 

पुणे मेट्रोच्या बुधवार पेठ स्थानकांचे नाव बदलून कसबा पेठ आणि केले जाण्याची शक्यता आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव महामेट्रोने राज्य सरकारसह केंद्र सरकारकडे पाठविला आहे. तो मंजूर झाल्यानंतर या स्थानकांची नावे बदलण्याची अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.  आयडीयलचेही नाव बदलणार वनाझ ते रामवाडी मार्गिकेवरील 'आयडियल कॉलनी' स्थानक पौड फाटा, केळेवाडी या ठिकाणी आहे; परंतु, आयडियल कॉलनी या स्थानकापासून काही अंतरावर आहे. त्यामुळे या स्टेशनचे नाव बदलण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार या प्रस्तावात आयडियल कॉलनीचे नाव बदलण्याचा मुद्दाही नमूद करण्यात आला आहे. 

भोसरी स्थानकाच्या नावावरूनही गोंधळ  भोसरी स्थानकामुळे प्रवाशांमध्ये विशेषत: गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे-मुंबई महामार्गालगत नाशिक फाटा येथे हे स्थानक असताना त्याला ‘भोसरी स्टेशन’ असे नाव देण्यात आले आहे. त्या स्थानकापासून भोसरी स्टेशन जवळपास १० किलोमीटर लांब आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणी येत आहेत. स्थानिक नागरिकांना भोसरी आणि नाशिक फाटा या भागाबद्दल माहिती आहे, परंतु नवीन माणसाचा स्टेशनच्या नावावरून गोंधळ होण्याची शकयता आहे. परंतु हे नाव बदलण्याबाबत कुठलाही विचार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  

टॅग्स :Metroमेट्रोpassengerप्रवासीticketतिकिटPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका