शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
2
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
3
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
4
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
5
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
6
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
7
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
8
Health Tips: हृदय विकाराच्या 'या' सात सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच करा उपाय!
9
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
10
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
11
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
12
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
13
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
14
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
15
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
16
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
17
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
18
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
19
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
20
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
Daily Top 2Weekly Top 5

Pune Metro: हिंजवडी मेट्रोचे ७१५ खांब तयार; दिवाळी आधी काम पूर्ण करण्याचे नियोजन

By राजू इनामदार | Updated: September 14, 2023 16:00 IST

उर्वरित खांब दिवाळीच्या आधी पूर्ण करण्याचा ठेकेदार कंपनीचा प्रयत्न आहे...

पुणे : शिवाजीनगर हिंजवडी या मेट्रो मार्गाचे खांब उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. २३.३ किलोमीटर अंतराच्या हा मेट्रो मार्ग एकूण ९२३ खांबांवर असणार आहे, त्यापैकी ७१५ खांब उभारून तयार झाले आहेत. त्यावर मेट्रो मार्गासाठी टाकाव्या लागणाऱ्या पाईल कॅपही बांधण्यात आल्या आहेत. उर्वरित खांब दिवाळीच्या आधी पूर्ण करण्याचा ठेकेदार कंपनीचा प्रयत्न आहे.

हिंजवडीच्या आय टी हबमध्ये काम करणाऱ्यांसाठी ही मेट्रो दिलासा ठरणार आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी या रस्त्यावरील वाहतूक कमी होण्यासाठी मेट्रोचा उपयोग होणार आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या ( पीएमआरडीए) माध्यमातून पीपीपी ( पब्लिक प्रायव्हेट पार्टनिरशिप) तत्वावर या मेट्रोचे काम सुरू आहे. त्यासाठी पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड ही विशेष कंपनी स्थापन करण्यात आली आहे. खासगी कंपनीकडे निविदेच्या माध्यमातून काम देण्यात आले असून ते पूर्ण झाल्यावर त्यांच्याकडेच  मेट्रोचे संचलन पुढील ३५ वर्षांसाठी देण्याचा करार करण्यात आला आहे.

या मेट्रोच्या प्रत्येक खांबाचा व्यास २००० मिलिमिटर व्यासाचा आहे. उच्च दर्जाच्या काँक्रिटच्या साह्याने तो तयार करण्यात आला आहे. दोन खांबांमधील अंतर सेगमेंटने (सिमेंट क्राँक्रिटच्या पट्ट्या) भरून काढण्यात येईल. त्यावर मग मेट्रोचे रूळ टाकण्यात येणार आहेत. सेगमेंट तयार करण्याचे काम कास्टिंग यार्डमध्ये सुरू आहे. ते तिथून प्रत्यक्ष जागेवर आणून बसवण्यात येतील. उर्वरित खांबांचे काम पूर्ण होत असतानाच आता त्यावर सेगमेंट टाकण्याचे कामही सुरू करण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोhinjawadiहिंजवडी