घरात लागलेल्या आगीत होरपळल्यानं तरूणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 10:22 AM2020-03-11T10:22:42+5:302020-03-11T10:28:42+5:30

भांडारकर रोडवरील दुर्दैवी घटना

in pune man dies after house catches fire kkg | घरात लागलेल्या आगीत होरपळल्यानं तरूणाचा मृत्यू

घरात लागलेल्या आगीत होरपळल्यानं तरूणाचा मृत्यू

googlenewsNext

पुणे : भांडारकर रोडवरील एका घरात लागलेल्या आगीत तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. संदीप विनायक गोखले (वय ४६, रा. राजेश्री, गल्ली क्रमांक ६, भांडारकर रोड) असे या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भांडारकर रोडवरील गल्ली क्रमांक ६ मध्ये सोसायटीच्या आऊटहाऊसमध्ये पहाटे २ वाजून ५३ मिनिटांनी आग लागल्याची अग्निशमन दलाला वर्दी मिळाली. एरंडवणा येथील गाडी तातडीने घटनास्थळी रवाना झाली. सुमारे ३०० चौरस फुटाच्या या जागेतून मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. एरंडवणा आणि कसबा फायरच्या जवान व देवदूत यांच्या कर्मचार्‍यांनी काही वेळातच ही आग विझवली. आतील सर्व पुस्तके व इतर साहित्य जळून खाक झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आत जाऊन पाहिले असताना तेथे एक तरुण निपचित पडलेला आढळून आला. या आगीत त्याचा होरपळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

Web Title: in pune man dies after house catches fire kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.