सव्वा नऊ तासांत पुणे ते महाबळेश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:21 IST2021-02-05T05:21:53+5:302021-02-05T05:21:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी मानसिक कणखरता ही महत्त्वाची असते. मानसिक क्षमता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून एटेनएक्स ...

Pune to Mahabaleshwar in 15 minutes | सव्वा नऊ तासांत पुणे ते महाबळेश्वर

सव्वा नऊ तासांत पुणे ते महाबळेश्वर

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी मानसिक कणखरता ही महत्त्वाची असते. मानसिक क्षमता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून एटेनएक्स स्पोर्ट्सने आयोजित केलेली ‘पुणे ते महाबळेश्वर रिले’ ट्रायअथलीट वर्धन बोरगावे, साकेत गणेशवाडे, आदित्य गणेशवाडे, तेज खाडिलकर, करण अंतुरकर, राज जोशी, चिन्मय चोपडे, शंकर राऊत, प्रतीक आकडकर यांनी ९ तास १५ मिनिटांत पूर्ण केले. हे अंतर १२६ किलोमीटर होते.

अंतर पूर्ण केल्यानंतर, एटेनएक्स स्पोर्ट्सचे संस्थापक व संचालक आदित्य गणेशवाडे म्हणाले की, पहाटे ४ वाजता राष्ट्रध्वजाला सलामी देऊन वारजे भागातून या रिलेला सुरुवात केली. बरोबर ९ तास १५ मिनिटात आम्ही १२६ किमी अंतर पार करताना दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी फिनिशिंग लाईनला पोहोचलो.

ट्रायअथलीट वर्धन बोरगावे म्हणाले की, निर्धारित वेळेत हा रिले पूर्ण करण्यासाठी सर्वच धावपटूंनी मेहनत केली होती. रोजच्या सरावामुळे हा रिले पूर्ण करता आला. या धावपटूमध्ये असलेले डॉ. चिन्मय चोपडे म्हणाले की, नियमित योगाभ्यास व सरावामुळे प्रत्येक धावपटूने आपले १०० टक्के योगदान दिले. रिले पूर्ण होऊन देखील कोणताही धावपटू जायबंदी झाला नाही.

Web Title: Pune to Mahabaleshwar in 15 minutes