शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

Pune Lok Sabha Result 2024: मोहोळ आणि धंगेकर यांच्यात अटीतटीची लढत; वसंत मोरे स्पर्धेपासून 'वंचित'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 14:12 IST

Pune Lok Sabha Result 2024: वसंत मोरेंना या लढतीत आघाडी मिळवण्यासाठी लाखोंच्या फरकाने मत मिळवावी लागतील

Pune Lok Sabha Result 2024 : देशभरात निवडणूक निकालाची उत्सुकता लागली असून, पुणे जिल्ह्यात देखील ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याने अंतिम फेरीनंतरच निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. पुण्यातून मुरलीधर मोहोळ  (Murlidhar Mohol), महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तर वंचित बहुजन आघडीकडून वसंत मोरे (vasant more) हे तिघे उमेदवार उभे राहिले आहेत. पुण्यात मोहोळ आणि धंगेकर यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. आताही १० व्या फेरीनंतर मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत. तर रवींद्र धंगेकर यांना आघडी मिळवण्यासाठी ६० हजार मतांची गरज आहे. अशातच तिसरे उमेदवार वसंत मोरे हे दोघांच्या स्पर्धेत अजिबात दिसत नसल्यचे स्पष्ट झाले आहे. 

मोरेंना ८ व्या फेरीनंतर १८ हजार मते मिळाली होती. त्यांना दोघांना गाठण्यासाठी लाखोंच्या फरकाने आघाडी घ्यावी लागेल. हे आता अशक्य असल्याचे दिसून आले आहे. प्रचाराच्या वेळी त्यांनी पुणेकर मलाच निवडून देतील असं भाकीत त्यांनी केलं होत. आता मात्र पुण्याच्या सहाही विधानसभा मतदार संघतून फक्त मोहोळ आणि धंगेकर यांची अटीतटीची लढत दिसून आली आहे. वसंत मोरे यांना  आठव्या फेरीनंतर १८ हजार ५३७ मते मिळाली आहेत. चार फेऱ्यानंतर पुण्यात भाजपच्या मुरलीधर मोहोळांनी (Murlidhar Mohol) २७ हजार ५९८ ची आघाडी घेतली होती. मोहोळांनी धंगेकरांच्या (Ravindra Dhangekar) कसबा मतदारसंघातून ५ हजार १३१ मतांची आघाडी घेतली होती. आतापर्यंत कसबा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांना १७ हजार ७५१ मते तर रवींद्र धंगेकरांना १२ हजार ६२० मते मिळाली. तर पाचव्या फेरीअखेरीस मुरलीधर मोहोळ ३४ हजार ८५१ मतांनी पुढे होते. या फेरीअखेरीस रविंद्र धंगेकर यांना १ लाख ११ हजार ८८९ मते मिळाली तर मोहोळ यांना १ लाख ४५ हजार ७४० मते मिळाली होते. आता सहाव्या फेरीअखेर मुरलीधर मोहोळ ३७ हजार ६९३ ने आघाडीवर आहेत.  सातव्या फेरीनंतर मोहोळ यांना ४५ हजार ४१९ च्या फरकाने पुढे आहेत. तर आता आठव्या फेरीनंतर मुरलीधर मोहोळ हे तब्बल ४६  हजार ४६९ मतांनी आघाडीवर आहेत. या फेरीत १ हजार ५० चा लीड मोहोळ यांना मिळाला आहे.   

सातव्या फेरीत मिळालेले मतदान 

वडगाव शेरी - धंगेकर - ४९३७  - मोहोळ - ५२११शिवाजीनगर -२७४४  - ३७०८कोथरुड - ४२२०- ५९२५पर्वती - ४७०९- ५२६७ कॅन्टोनेंंट - ४८०४ - ३८९७कसबा - २६२७ - ५९३४एकूण. -  २४०५१ -  ३०९४२मोहोळ यांची एकूण आघाडी - ६८९१ (एकूण ४५४१९)

आठवी फेरीत मिळालेले मतदान 

वडगाव शेरी - धंगेकर - ४८७५  - मोहोळ - २९१५शिवाजीनगर -२६३६  - १६६०कोथरुड - ४५७४- ५२६५पर्वती - ३२९८- ६००६ कॅन्टोनेंंट - २९५५ - ४६२९कसबा - ४८९२ - ३५०५एकूण. -  २२९३० -  २३९८०मोहोळ यांची एकूण आघाडी - १०५० (एकूण ४६४६९) 

टॅग्स :Puneपुणेpune-pcपुणेmurlidhar moholमुरलीधर मोहोळbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Vasant Moreवसंत मोरे