पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांसाठी आज मतदान होत आहे यातील पुणे मतदारसंघासाठी काँग्रेसचे महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी व महायुतीचे गिरीश बापट यांनी आपल्या कुटुंबासमवेत पुण्यात सकााळी सात ते आठच्या दरम्यान मतदान केले. मोहन जोशी व गिरीश बापट यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. पुण्याची लढत राज्यातील महत्वाच्या लढतींपैकी एक समजली जाते. तसेच बारामती, मावळ , शिरुर मतदारसंघासाठी देखील मंगळवारी मतदान होत आहे. एकूणच या सर्व लढतींकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
महापालिका प्रशासनाकडून सर्व यंत्रणांनी कंबर कसलेली आहे. मतदानासाठी तसेच या लढतींमध्ये काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना यांसह अनेक पक्षांचे प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात पार्थ पवार, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, शिवाजी आढळराव पाटील , मोहन जोशी , गिरीश बापट ,श्रींरग बारणे, आदी उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. राज्यात सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी प्रचार सभांमध्ये आरोप चप्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या.