शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

पुण्यात मताधिक्य वाढताच मोहोळ समर्थक जल्लोषात; काँग्रेस कार्यकर्ते पांगायला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 12:39 IST

पुण्यातील निवडणूक ही नगरसेवकांची निवडणूक संबोधली जात होती. कारण या मतदारसंघात उभारलेले प्रमुख उमेदवार हे यापूर्वी पुणे महापालिकेत नगरसेवक राहिले आहेत....

Pune Lok Sabha Result 2024| पुणे : पाचव्या फेरीअखेरीस मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) ३४ हजार ८५१ मतांनी पुढे होते. या फेरीअखेरीस रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना १ लाख ११ हजार ८८९ मते मिळाली तर मोहोळ यांना १ लाख ४५ हजार ७४० मते मिळाली होती. आता सहाव्या फेरीअखेर मुरलीधर मोहोळ यांनी ३७ हजार ६९३ मतांची लीड घेतली आहे. त्यामुळे पुण्यातील भाजपा कार्यलयात तसेत मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाजवळ भाजप कार्यकर्ते जमा होत आहेत. तसेच काही कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला आहे. तर काँग्रेस भवन परिसरात शुकशुकाट पसरला आहे. काँग्रेस उमेदवार आमदार रवींद्र धंगेकरांना त्यांच्या कसबा मतदारसंघातही अपेक्षित प्रतिसाद भेटला नसल्याचे दिसते. कारण सध्या मोहोळ यांना कसबा मतदारसंघातून लीड मिळाली आहे. तर शेवटच्या अपडेटनुसार मुरलीधर मोहोळ ४५ हजारांनी आघाडीवर आहेत.

पुण्यातील निवडणूक ही नगरसेवकांची निवडणूक संबोधली जात होती. कारण या मतदारसंघात उभारलेले प्रमुख उमेदवार हे यापूर्वी पुणे महापालिकेत नगरसेवक राहिले आहेत. यामध्ये माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार रवींद्र धंगेकर तसेच माजी नगरसेवक आणि वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांचा उल्लेख केला पाहिजे. मोरे यांना पुणेकरांना नाकारलेले दिसत आहेत. मोहोळ आणि धंगेकरांना जेवढी मते मिळत आहेतत त्याच्या जवळपासही मोरे नाहीत.

मुरलीधर मोहोळांना मिळालेला लीड तोडणे धंगेकरांना खूप अवघड जाणार आहे. सहाव्या फेरीअखेर मुरलीधर मोहोळ यांनी ३७ हजार ६९३ मतांची लीड घेतली आहे. त्यामुळे आता पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस भवन आणि रवींद्र धंगेकरांच्या कार्यालयाजवळ शुकशुकाट पसरला आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण २० लाख ६१ हजार २७६ मतदार आहेत. त्यापैकी ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात वडगाव शेरी २ लाख ४१ हजार ८१७, शिवाजीनगर १ लाख ४१ हजार ११३, कोथरूड २ लाख १७ हजार ४५५, पर्वती १ लाख ८९ हजार १८४, पुणे कॅन्टोन्मेंट १ लाख ४९ हजार ९८४, तर कसबा मतदारसंघात १ लाख ६४ हजार १०५ मतदान झाले आहे.

यंदा ६८ हजार ४२२ मतदान अधिक-

पुणे लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत १० लाख ३५ हजार २३६ नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले हाेते. यंदा ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा ६८ हजार ४२२ अधिक मतदान झाले आहे.

टॅग्स :pune-pcपुणेmurlidhar moholमुरलीधर मोहोळravindra dhangekarरविंद्र धंगेकरmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४