शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
3
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
4
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
6
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
7
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
8
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
9
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
10
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
11
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
12
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
13
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
14
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
15
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
16
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
17
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
18
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
19
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
20
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर

मद्यप्रेमींनो, घरबसल्या मागवा आपल्या आवडीचे मद्य; उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 16:03 IST

घरपोच सेवा स्वतःला उभारावी लागणार

पिंपरी : पुण्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने येत्या तीस एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घातले आहेत. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी कडक टाळेबंदी असणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि मद्य विक्री करणाऱ्या दुकानांना घरपोच सेवा देण्यास परवानगी दिली आहे.

ग्राहकांना हॉटेल आणि बार मध्ये जाऊन पदार्थ घेण्यास मनाई आहे. त्यांना ई- कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून खाद्यपदार्थ मागविता येतील. मद्य विक्री दुकानांना अ‍ॅपद्वारे तसेच घरपोच सुविधेद्वारे सेवा देत येईल. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत घरपोच सेवा देता येईल. नियमानुसार मद्य विक्री ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून देता येणार नाही. घरपोच मद्य सेवा देण्यात अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

मागच्या वर्षी अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे मद्य दुकाने मद्यप्रेमींना बंद झाली होती. तब्बल दीड एक महिना सर्व दुकाने बंद होती. त्याचा मद्यप्रेमींना झटका आणि सरकारला चांगलाच फटका बसला होता. मे महिन्यात परत दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला.आणि त्यानंतर कोरोनाचा विसर पडल्यागत नागरिकांनी दुकानांसमोर अक्षरश : भल्या मोठ्या रांगा लावत मद्याची खरेदी केली होती. मद्यप्रेमींनी त्यावेळी राज्य सरकारच्या महसुलात भरीव योगदान दिले होते.त्यामुळे यावेळी लॉकडाऊन करताना राज्य सरकारने ऑनलाईन मद्य विक्रीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.मात्र यात आता मद्य विक्रेत्यांची कसरत होणार असून त्यांना घरपोच मद्यविक्रीसाठी यंत्रणा उभारावी लागणार आहे.

बार आणि वाईन्स शॉपला घरपोच सेवा देता येणार आहे. मात्र त्यासाठीची यंत्रणा त्यांना स्वतःलाच उभारावी लागेल. शिवाय त्यासाठी केवळ त्यांच्याच कामगारांची नेमणूक करावी लागेल. ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्यांचा उपयोग त्यांना करता येणार नाही. 

 ---- ई कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून मद्य पुरविता येत नाही. त्यांना घरपोच सेवा स्वतः उभारावी लागेल. कमी मनुष्यबळात हे काम अवघड आहे. तसेच, बार चालकांनी छापील किंमतीवर मद्य विकल्यास त्यांना परवडणार नाही. कारण त्यांना मद्यावर मूल्यवर्धित कर भरावा लागतो. बार चालकांनी उन्हाळ्यासाठी बीअरचा अधिक साठा ठेवला होता. बीअर सहा महिन्यात खराब होते. त्यामुळे बीअर विक्रीवर बारचालकांचा अधिक भर असेल. गणेश शेट्टी, अध्यक्ष, पूना हॉटेल, रेस्टॉरंट अँड बार असोसिएशन ----- उत्पादन शुल्क विभागाबरोबर वाईन्स शॉप चालकांचा नोकरनामा असतो. अशा नोंदणीकृत व्यक्तिंच्या माध्यमातून घरपोच सेवा द्यावी लागेल. शिवाय ग्राहकांपर्यंत दुकानाचा मोबाईल क्रमांक कसा पोचवायचा, कमी मनयुष्यबळामध्ये मालाचा पुरवठा कसा करणार? दुकान उघडल्या शिवाय मद्य पुरवठा करता येणार नाही. उत्पादनशुल्क विभागाकडून त्याबाबतचे स्पष्ट आदेश हवेत. अजय देशमुख, सचिव, पुणे डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंट असोसिएशन ---- ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपनी मार्फत मद्य पुरवठा करता येणार नाही. दुकानाबाहेर मोबाईल क्रमांक द्यावा. त्या माध्यमातून मागणी नोंदवून घरपोच पुरवठा करावा. या पूर्वी घरपोच सेवेबाबत दिलेली नियमावली कायम आहे. संतोष झगडे, अधीक्षक, उत्पादनशुल्क, पुणे

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडonlineऑनलाइनliquor banदारूबंदीState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या