शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

Pune Lock down 2.0 : लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय उपचार व अत्यावश्यक सेवेसाठी ऑटो रिक्षासह ' ही ' सुविधा असणार उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 20:43 IST

तुम्हाला वैद्यकीय उपचारासाठी किंवा अत्यावश्यक सेवेसाठी ' या ' व्हाट्स अप क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे.

ठळक मुद्देरेल्वे स्टेशन आणि विमानतळासाठी बुक 2 राईड सेवा

पुणे : येत्या सोमवारपासून सुरु करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनचे काळात तातडीचे वैद्यकीय उपचार तसेच अत्यावश्यक सेवेकरीता शहरात प्रवास करण्यासाठी काही पर्याय उपलब्ध करून देेण्यात येणार आहे. त्यासाठी ९८५९१९८५९१ हा व्हॉटसअप मोबाईल क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या क्रमांकावर व्हॉटसअप द्वारे संपर्क साधल्यावर प्रवास कोणत्या कारणाकरीता करणार आहे, याची माहिती देऊन हे कारण अत्यावश्यक सेवेत बसत आहे, अशा कारणाकरीता ऑटो रिक्षा उपलब्ध होणार आहे.

ही आॅटो सेवा तातडीचे वैद्यकीय उपचाराचे अनुषंगाने व अत्यावश्यक सेवेकरीता जा ये करत असलेल्या नागरिकांकरिता सुविधा उपलब्ध असणार आहे.

ही सेवा देणारे रिक्षा चालक यांचे वय ४५ वर्षाचे आतील असून आॅटो रिक्षा ही सॅनिटाईज केलेली व प्रवास करता रिक्षाचालक व प्रवासी यांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे. तसेच रिक्षा हँड सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्याबाबत रिक्षा चालक यांना सूचना देण्यात येणार आहेत.मागील लॉकडाऊनचे कालावधीत २२ हजार अत्यावश्यक सेवेचे कॉलधारक नागरिकांना आॅटो उपलब्ध करुन दिल्याने त्यांनी प्रवास केलेला आहे. ज्या नागरिकांना अत्यावश्यक तातडीचे कारणाकरीता व्हॉटसअप मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून सेवा घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.

020-66100100रेल्वे स्टेशन, विमानतळासाठी बुक २ राईड सेवापुणे शहर, पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊन करण्यात येत असला तरी पुण्यात येणारे व पुण्यातून जाणाऱ्या रेल्वे, विमान प्रवाशांसाठी बुक २ राईड ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे़ महाराष्ट्र कॅब सर्व्हिसच्या वतीने पुणे विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि अत्यावश्यक वैद्यकीय कारणासाठी ही कॅब सेवा उपलब्ध आहे. त्यासाठी ०२०-६६१००१०० या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा. सोयीस्कर दर आणि सॅनिटाईज केलेली कार व कारचालक व प्रवाशांना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिसauto rickshawऑटो रिक्षाMedicalवैद्यकीय