शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळा घाटातली दरड हटवली, पुणे-मुंबई रेल्वे सेवा पूर्ववत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 08:30 IST

पुणे-मुंबई लोहमार्गावर शनिवारी (25 ऑगस्ट) रात्री 10.50 वाजण्याच्या सुमारास मंक्की हिलजवळ अप व मिडल या दोन्ही मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.

लोणावळा : पुणे-मुंबई लोहमार्गावर शनिवारी (25 ऑगस्ट) रात्री 10.50 वाजण्याच्या सुमारास मंक्की हिलजवळ अप व मिडल या दोन्ही मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली होती. मध्यरात्री खंडाळा घाटातली दरड हटवण्यात आल्यानं पुणे-मुंबई रेल्वे सेवा पूर्ववत झाली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, दरड कोसळल्यानं शनिवारी अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या होत्या. रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या अप लाईनवरील दरड हटवून हा मार्ग सुरु करण्यात आला असला तरीही मिडल लाईन ही बंदच होती.   मंक्की हिलजवळ दरड कोसळल्याने कोल्हापूर-अहमदाबाद ही गाडी खंडाळा रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली तर सोलापूरला जाणारी सिद्धेश्वर एक्स्प्रेस सीएसटीलाच थांबविण्यात आली होती. यासह रात्रीच्या वेळेला धावणार्‍या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावल्या. लोणावळा व खंडाळा परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर असल्याने डोंगरभागातील दगड मार्गावर येऊ लागले आहे. शुक्रवारी (24 ऑगस्ट) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास देखील याच ठिकाणी रेल्वे इंजिनच्या समोर दरड कोसळली होती. सुदैवाने त्यावेळी वाहतुकीवर परिणाम झाला नव्हता.

याठिकाणी सुरक्षेचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी दिवसभर विद्युत पुरवठा बंद ठेवत डोंगरातील धोकादायक दगड काढले होते. यानंतरही शनिवारी पुन्हा त्याच ठिकाणी दरड पडल्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने दोन्ही घटन‍ांमध्ये कोणतीही जीवितहानी वा वित्तहानी झालेली नाही.

शनिवारी रात्रीची दरड ही अप व मिडल या दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात पडल्याने वाहतुकीचा पूर्णतः खोळंबा झाला होता. ही दरड पडल्याची माहिती समजल्यानंतर तातडीने लोणावळा व कल्याण येथील आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी मोठे दगड हटवण्याचे काम सुरू करत अप लाईन मध्यरात्री सुरू केल्याने उशिराने का होईन रेल्वे सेवा धीम्या गतीने सुरू झाली.

टॅग्स :Puneपुणेlandslidesभूस्खलनMumbaiमुंबईlocalलोकल