शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

दरड कोसळल्यानं माळशेज घाटातील वाहतूक दोन दिवस बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 13:40 IST

माळशेज घाटात आज पहाटेच्या सुमारास दरड कोसळली आहे. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

पुणे - अहमदनगर कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात मंगळवारी उशीरा रात्री दरड कोसळल्याची घटना घडली. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास छत्री पाँइंटजवळ ही घटना घडली आहे. या घटनेत आयशर टेम्पोवर दरड कोसळल्यानं टेम्पोचा चेंदामेंदा झाला असून चालक अमोल दहिफळे गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी आळे फाटा येथे हलवण्यात आले आहे. ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे यांनी ही माहिती दिली आहे.  

दरम्यान, युद्धपातळीवर दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, माळशेज घाटात सध्या दाट धुके व पाऊस यामुळे मदत कार्यात अडथळे येत आहे. खबरदारी म्हणून माळशेज मार्गाने होणारी वाहतूक दोन दिवसांठी बंद ठेवण्यात आली आहे. 

अपघातात थोडक्यात बचावले बापलेकशहादेव रामा दहिफळे आणि त्यांचा मुलगा अमोल दहिफळे हे दोघे कल्याण येथून कटलरी माल असलेला टेम्पो घेऊन नगरमार्गे जात होते. माळशेज घाटात पोहोचल्यानंतर तेथे जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे अमोल टेम्पो हळूहळू चालवित होतो. मात्र काही समजण्याच्या आतच गाडीवर दरडी कोसळली. यानंतर वेळीच हँडब्रेक दाबून दोघंही खाली उतरले. सुदैवानं दोघांचेही जीव वाचला. मात्र दरडीसहीत टेम्पो २५ ते ३० फूट खोली दरीत कोसळला. 

 

माळशेज घाटात दरड कोसळून टेम्पोचा चक्काचूर, टेम्पोचालक जखमी

 

 

टॅग्स :landslidesभूस्खलनPuneपुणेthaneठाणे