शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील जमीनदार नगरसेवक बीडीपीवर आग्रही; नुकसान होत असल्याने धोरण ठरविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 15:33 IST

प्रशासनाने जैवविविधता टेकड्यांबाबत हद्द निश्चित करून धोरण ठरवावे, अशी मागणी महापालिकेच्या शहर पर्यावरण अहवालावर आयोजित खास सभेत करण्यात आली.

ठळक मुद्देबीडीपीबाबत ठरवले गेलेले नाही धोरण, जमीनमालकांचे होत आहे नुकसानगेल्या वर्षभरापासून बीडीपीत किमान काही टक्के बांधकाम करू द्यावे, अशी होत आहे मागणी

पुणे : प्रशासनाने जैवविविधता टेकड्यांबाबत हद्द निश्चित करून धोरण ठरवावे, अशी मागणी महापालिकेच्या शहर पर्यावरण अहवालावर आयोजित खास सभेत करण्यात आली. सत्ताधारी भाजपात विविध पक्षांमधून आलेल्या जमीनदार नगरसेवकांचाच यात प्रामुख्याने समावेश होता.पर्यावरण अहवालावरील या सभेत विशेषत्वाने हीच मागणी झाली. बीडीपीबाबत काहीच धोरण ठरवले गेलेले नाही. जागेवर बीडीपी आरक्षण टाकून दुर्लक्ष करण्यात आले आहे. यात जमीनमालकांचे नुकसान होत आहे. त्या जागांवर प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने अतिक्रमणे होत आहेत. त्याऐवजी अशा आरक्षित जागेवर मालकाला काही टक्के बांधकामाची परवानगी द्यावी, त्यालाच त्या जागेचा विकास करण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना नगरसेवकांनी केली. अमोल बालवडकर, हरीदास चरवड, किरण दगडे, दिलीप वेडे आदी नगरसेवक यासाठी आग्रही होते. उपनगरातील नगरसेवक त्यात जास्त संख्येने होते. महापालिका हद्दीत समावेश झालेल्या गावांमध्ये असलेल्या टेकड्यांवर पर्यावरण संवर्धनासाठी बीडीपी आरक्षण टाकण्यात आले असून तिथे कसलेही बांधकाम करण्यास, खोदाई करणयास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील जमीनमालक, तिथे इमारती बांधू पाहणारे बांधकाम व्यावसायिक यांची अडचण झाली आहे. त्यामुळेच गेल्या वर्षभरापासून बीडीपीत किमान काही टक्के बांधकाम करू द्यावे, अशी मागणी होत आहे. पर्यावरण अहवालावर आयोजित सभेतही हाच मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आला.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे