बावधन येथील बीडीपी आरक्षित डोंगर फोडून प्लॉट करण्याचे काम स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:03 PM2018-01-13T13:03:11+5:302018-01-13T13:09:42+5:30

बावधन येथील बीडीपी आरक्षित (जैवविविधता उद्यानासाठी) डोंगर फोडण्याचा एका बांधकाम व्यावसायिकाचा डाव काही स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांमुळे बंद पडला.

close illegal construction on BDP reserve hill area with the help of NGO in Bavdhan, Pune | बावधन येथील बीडीपी आरक्षित डोंगर फोडून प्लॉट करण्याचे काम स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नाने बंद

बावधन येथील बीडीपी आरक्षित डोंगर फोडून प्लॉट करण्याचे काम स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नाने बंद

googlenewsNext
ठळक मुद्देबावधन येथे सर्व्हे क्रमांक ६०/२ ही जागा बीडीपी आहे आरक्षितबावधन पोलीस ठाण्यात फिर्याद, कामावर उपस्थित असलेले तुषार काळे यांना बजावली नोटीस

पुणे : बावधन येथील बीडीपी आरक्षित (जैवविविधता उद्यानासाठी) डोंगर फोडण्याचा एका बांधकाम व्यावसायिकाचा डाव काही स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांमुळे बंद पडला. महापालिकेनेही याची तत्काळ दखल घेऊन तिथे या कामावर उपस्थित असलेल्या व्यक्तीच्या विरोधात पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.
बावधन येथे सर्व्हे क्रमांक ६०/२ ही जागा बीडीपी आरक्षित आहे. डोंगर स्वरूपात असलेली ही जागा फोडून तिथे प्लॉट तयार करण्याचा प्रकार सुरू होता. गेल्या काही दिवसांपासून हे काम सुरू होते. काही स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी हे पाहिले. त्यांनी त्वरित त्याबाबत काही राजकारणी व्यक्तींना कळवले. त्यांनी त्याची दखल घेत महापालिकेकडे तक्रार केली.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत खरोखरच डोंगर फोडला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ त्याबाबत बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तसेच त्या कामावर उपस्थित असलेले तुषार काळे यांना नोटीसही बजावली. 
कामही लगेचच थांबवण्यात आले. बीडीपी आरक्षित जागेवर असे खोदकाम करण्यास मनाई असतानाही असा प्रकार केल्याबद्दल संबधितांवर गुन्हा दाखल करावा, असे महापालिकेने फिर्यादीत म्हटले आहे. 

Web Title: close illegal construction on BDP reserve hill area with the help of NGO in Bavdhan, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.