शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
8
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
9
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
10
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
11
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
12
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
13
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
14
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
15
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
16
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
17
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
18
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
19
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
20
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल

Kasba By Elelction: 'आता दुसऱ्याला संधी देऊन बघू...' कसब्यातील मतदारांचा कौल कोणाकडे? पहा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 12:52 IST

आम्हाला कोणीही लोकप्रतिनिधी उत्सवापुरता हजेरी लावणारा नको

पुणे: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दोन्हीकडे भाजप आणि महविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. दोन्ही पक्षाचे नेते बैठका घेण्याबरोबरच प्रचारातही सहभागी होत आहेत. राज्याचे मुखमंत्री , उपमुख्यमंत्री यांनीसुद्धा निवडणुकीच्या अनुषंगाने कसबा - चिंचवड मतदार संघात भेटी दिल्या आहेत. तसेच त्या भागातील नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या आहेत. 

कसबा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक आगामी महापालिकेच्या निवडणुकांचं भविष्य ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे, या विधानसभेत गेली ३० वर्षे भाजपचे सरकार आहे. त्यामुळे भाजपने कसब्यातील सीट मिळ्वण्यासाठी कंबर कसली आहे. तर महविकास आघाडीसुद्धा जोरदार प्रचार करू लागली आहे. परंतु येथील नागरिकांचा कौल कोणाकडे आहे. याबाबत लोकमतने कसबा मतदार संघातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी  भाजप बास झालं आम्ही दुसऱ्याला संधी देऊन बघू अशी प्रतिक्रिया दिली आहे.  

हेमंत रासने यांना आम्ही कधीच पहिले नाही, ते कसब्यात कधीच दिसले नाहीत. तर रासने यांच्यापर्यंत सामान्य माणूस पोहचू शकत नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. भाजपच्या आधीच्या आमदाराबाबत विचारले असता मतदार म्हणाले, भाजपच्या आधीच्या आमदार आम्हाला कधीही भेटायला आल्या नाहीत. इथे वाहतूककोंडी, पाणी, रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत. महागाई खूप वाढली आहे. याबद्दल त्यांनी कधी विचारलं नाही. 

रवींद्र धंगेकर यांचा सामान्यांशी दांडगा संपर्क 

रवींद्र धंगेकर यांनी सामान्य माणसाला खूप मदत केली. कोरोना काळातही या भागातील नागरिकांच्या समस्या सोडवल्या आहेत. आता आम्हाला वाटतंय की, धंगेकरच निवडून येऊ शकतात. कारण सामान्य माणूस रासने यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही पण धंगेकरांपर्यंत पोहचू शकतो. त्यांना कधीही बोलावलं तरी ते धावून येतात. एक व्यक्ती म्हणून धंगेकर साहेब खूपच चांगले आहेत. लोकांचा धंगेकर यांच्यावर विश्वास आहे, ते निवडून आल्यावर आपली कामे नक्कीच होतील. आता तरी चित्र असं दिसू लागले आहे की, धंगेकरच निवडून येतील. असे ठाम मतही नागरिकंनी व्यक्त केले. 

आता दुसऱ्याला संधी देऊन बघू 

आम्हाला कोणीही लोकप्रतिनिधी उत्सवापुरता हजेरी लावणारा नकोय. रवींद्र धंगेकर हे येऊन भेटू गेले आहेत. ते नेहमी सामान्य माणसांच्या संपर्कात असतात. इथे कित्येक वर्ष भाजपचं आहे. आता निवडणुकीच्या काळात भाजपचे मोठे नेते इथे आले तरी ते आमच्या गरजा पूर्ण करणार आहेत का? येथील लोकप्रतिनिधीच आमच्या गरज पूर्ण करतील. त्यामुळे आता भाजप बास झालं. आम्ही दुसऱ्याला संधी देऊन बघणार आहोत. 

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारण