शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचा आयटी इंजिनिअर पाक गुप्तहेरांच्या संपर्कात; स्पेशल टास्क फोर्सने केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 07:19 IST

जांबुरे हा अनेक वर्षांपासून सतत पाकिस्तानी गुप्तचर आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता.

पुणे : वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) घोटाळ्यात कथित सहभाग आणि उच्चस्तरीय पाकिस्तानी गुप्तचर कार्यकर्त्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली क्राइम ब्रँचच्या स्पेशल टास्क फोर्सने गुरुवारी पुण्यातून एकाला अटक केली. अभिजित संजय जांबुरे (३२) असे त्याचे नाव असून, ट्रान्झिट रिमांडवर भुवनेश्वरला आणण्यापूर्वी तेथील स्थानिक न्यायालयात त्याला हजर करण्यात आले.

जांबुरे हा अनेक वर्षांपासून सतत पाकिस्तानी गुप्तचर आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. २०१८ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून ताे पाकिस्तानी नागरिक सय्यद दानिश अली नकवीच्या संपर्कात आला. नकवी हा फैजलाबादचा रहिवासी असून, त्याने स्वत:ची ओळख चेगमध्ये अमेरिकन एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनीत काम करणारा फ्रिलान्सर म्हणून केली होती. जांबुरेने त्याचा यूझर आयडी आणि चेगचा पासवर्ड दानिश नकवीला दिला.

दानिशने काही लोकांना जांबुरे याच्या वतीने एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनीसाठी काम करायला लावले. ओडिशा आणि देशाच्या इतर भागांतील सायबर चोरट्यांकडून ओटीपी, खासगी माहिती आणि बँक खात्यांची खरेदी केली. त्याच्या बदल्यात कामाचे पैसे जांबुरे यांच्या भारतातील बँक खात्यात जमा झाले. जांबुरेने पाकिस्तानसाठी काम करणाऱ्या एजंट्सना पैसे दिले, असे एसटीएफच्या अधिकाऱ्याने सांगितले.

दानिशने नंतर जांबुरेची ओळख त्याचा मित्र अब्दुल हमीद ऊर्फ खुर्रमशी करून दिली, जो कराचीचा रहिवासी आहे. खुर्रम हा पाकिस्तानी लष्कराचा एक वरिष्ठ गुप्तचर अधिकारी असून, त्याच्याकडे भारतात एजंटांचे मोठे नेटवर्क आहे. खुर्रमच्या सूचनेनुसार जांबुरेने भारतात काम करणाऱ्या पाकिस्तानी गुप्तचरांना पैसे हस्तांतरित केले. एसटीएफच्या तपासात असे दिसून आले की, जांबुरेने व्हाॅट्सॲपवर किमान सात पाकिस्तानी आणि १० नायजेरियन नागरिकांशी संपर्क केला.

कोण आहे अभिजित जांबुरे? महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या जांबुरे याने गुजरातमधील आणंद येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठातून सांख्यिकी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तो पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करत होता. त्याने सांख्यिकी विषयातील पदवी मिळवली आहे.

टॅग्स :ITमाहिती तंत्रज्ञानPakistanपाकिस्तानIndiaभारत