शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Pune airport: तब्बल 15 दिवसांनंतर पुन्हा विमानसेवा सुरू; पहिल्या दिवशी ५२ विमानांचे उड्डाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 14:08 IST

विमानांची वाहतूक सुरू होतानाच विमानतळ प्रशासनाने शनिवारपासूनच विंटर शेड्युलदेखील लागू केला आहे. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारपासून विमानसेवा सुरू होत असल्याने शुक्रवारी विमानतळावर एक प्रकारची लगीनघाई सुरू होती

पुणे: लोहगावविमानतळांवरून शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून विमानांच्या उड्डाणास सुरुवात झाली आहे. दिवसभरात ५२ विमानांची उड्डाणे होतील. जवळपास तेवढीच विमाने लोहगावविमानतळावर दाखल होतील. १५ दिवसांच्या बंदीनंतर विमानसेवा सुरू होत असल्याने पुण्याहून उड्डाण करणाऱ्या विमानाचे दरही आकाशाला गवसणी घालत आहेत. पुणे ते नागपूर तिकिटाचे दर २१ हजार रुपयांच्या घरात गेले आहे.

विमानांची वाहतूक सुरू होतानाच विमानतळ प्रशासनाने शनिवारपासूनच विंटर शेड्युलदेखील लागू केला आहे. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारपासून विमानसेवा सुरू होत असल्याने शुक्रवारी विमानतळावर एक प्रकारची लगीनघाई सुरू होती. रात्री ८ वाजेपर्यंत विमांनाचे शेड्युल ठरले नव्हते. शनिवारपासून पुणे विमानतळाचा विंटर शेड्युल सुरू होत असल्याने त्याचे अतिरिक्त नियोजन करावे लागत आहे. विंटर शेड्युलमध्ये पुण्याहून उड्डाण करणाऱ्यांच्या विमानांच्या संख्येत वाढ होत आहे. विमानतळ प्रशासनाने हे अद्याप जाहीर केले नसले तरीही जयपूर, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद आदी शहरांना जाणाऱ्या विमानाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडLohgaonलोहगावAirportविमानतळ